खराब रस्त्यामुळे पिंपळगाव हरे येथे बस फसली खड्ड्यात

खराब रस्त्यामुळे पिंपळगाव हरे येथे बस फसली खड्ड्यात

पिंपळगाव (हरेश्वर) Pimpalgaon (Hareshwar)

पाचोरा आगाराची बस (Bus Pachora Agar ) पिंपळगाव (हरेश्वर) गावानजीक (Pimpalgaon (Hareshwar)) अरुंद रस्त्यामुळे (narrow road) खड्ड्यात फसल्याची (Trapped in a pit)घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी (loss of life) झाली नसली (Didn't happen) तरी अरुंद रस्त्यामुळे भविष्यात (future ) अपघात होण्याची शक्यता (Chances of an accident) नाकारता येत नाही. या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे , अशी मागणी नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.

पाचोरा आगाराची बस (क्र. एम. एच. १४ बी. टी. २०७९) आज सोमवार, दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाचोऱ्याहून पिंपळगाव हरेश्वरच्या दिशेने निघाली. पिंपळगाव हरेश्वर स्थानकात पोहचण्याच्या आधी काही अंतरावर मनुदेवी मातेच्या मंदिराजवळ अरुंद रस्ता आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याच्या बाजूला खड्डे आहेत. समोरून येणाऱ्या  बस ला रस्ता देत असतांना बस चालकास त्याचा अंदाज न आल्याने सदरची बस ही रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्यात जावून फसली.

सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नसली तरी पुढील अनर्थ मात्र निश्चित टळला आहे. हा अरुंद रस्ता असल्याने याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com