
यावल - अरुण पाटील
शासनाच्या विविध विकास कामांमधून मंजूर झालेल्या बांधकामांसाठी यावल तालुक्यात वाळू उपलब्ध नसल्यामुळे विकास कामांना ब्रेक लागलेला असून प्रशासनाने यावल तालुक्यातील या प्रशासकीय कामांसाठी कमीत कमी वाळू उपलब्ध करून द्यावी अशी त्रस्त ठेकेदारांकडून तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून मागणी होत आहे.
यावल तालुक्यात तापी नदीतील वाळूचे लिलाव न झाल्यामुळे व जळगाव वरून गिरणा मधून वाळू उपलब्ध होत नसल्याने खासदार व आमदार तसेच पालकमंत्री यांनी मंजूर केलेल्या विविध विकास कामांसाठी वाळू मिळत नाही ठेकेदार वाळू द्या वाळू असे म्हणतात तर सदर विकास कामाची मंजूर आहेत त्यातील रॉयल्टी परस्पर ठेक्यामधून कापली जाणार आहे त्यासाठी महसूल प्रशासनाने विकास काम करण्यासाठी संबंधित मंजूर कामांसाठी वाळू उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
यावल तालुक्यात खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावल शहरासाठी मोठा निधी दिलेला आहे अनेक ठिकाणी काँक्रिटीकरण चे रस्ते मंजूर करून ठेवलेले आहे ठेकेदारांना वाळू मिळत नसल्याने सदर कामांना ब्रेक लागलेला आहे तसेच पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी सुद्धा यावल शहरात सुशोभीकरणासाठी नगरपरिषदेला काही निधी दिलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा वाढूनसल्यामुळे कामाला ब्रेक लागलेला आहे तसेच आमदार श्री शिरीष चौधरी व आमदार लताताई सोनवणे यांच्या स्थानिक विकास निधी मधून बऱ्याच गावांना कामे मंजूर आहेत वाळू नसल्याने तेही त्रस्त झालेले आहेत
पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील खासदार रक्षाताई खडसे आमदार शिरीष चौधरी आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याशी चर्चा करून सदर विकास कामांचा निधी हा मार्गी लागावा व काम त्वरित सुरळीत होण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करून वाळू उपलब्ध करून द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.