देखभाल व दुरुस्ती अभावी भुसावळ विभागात कोट्यावधींची बिले थकल्याने विजेचा लपंडाव

देखभाल व दुरुस्ती अभावी भुसावळ विभागात कोट्यावधींची बिले थकल्याने विजेचा लपंडाव

भुसावळ Bhusaval (प्रतिनिधी) -

भुसावळ शहर, भुसावळ ग्रामीण, जामनेर शहर ते थेट पहूरपर्यंत कार्यक्षेत्र असलेल्या भुसावळ विभागात (Bhusawal section) सरकारी कर्मचार्‍या व्यतिरिक्त अनेक लहान मोठ्या कंपन्यांना वेगवेगळ्या दुरुस्तीची (आऊटसोर्सिंग) कामे (Repair to companies) दिलेली आहे. या कंपन्यांना त्याची ठरलेली रक्कम नियमितपणे अदा (Pay the amount regularly) होत नसल्याने त्याचा परिणाम विभागात देखभाल व दुरुस्तीवर होत आहे. ही दुरुस्ती वेळच्यावेळी व नियमित होत नसल्याने भुसावळ शहर व ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित (Power outage) होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

या विभागात खाजगी कंपन्यांची १०० ते १५० कर्मचारी कार्यरत आहे. वीज मंडळाकडून दर तीन वर्षांसाठी विविध हेड खाली या निविदा मागवल्या जातात. तीन वर्षासाठी हे काम देऊन टप्प्याटप्प्याने या कंपन्यांना देयके दिली जातात. कोरोणाच्या संकटकाळात वीज वसुलीचे सर्व वेळापत्रक कोसळले. वितरण कंपनीला निर्मितीकडून वीज विकत घेऊन ती ग्राहकांपर्यंत पोहोचवावी लागते.
हे सर्व करीत असताना देखभाल व दुरुस्ती देखील करावी लागते. यात इलेक्ट्रिक खांब सरळ करणे, लोंबकळणार्‍या तारा व वायरी बदलणे, बॉक्स कट आउट बसविणे, केबल दुरुस्ती करणे, झाड कटिंग करणे, इन्सुलेटर बदलविणे, छोट्या व मोठ्या रोहीत्रांची दुरुस्ती, ऑईल बदलविणे, ट्रांसफार्मर बदलविणे, दुरुस्ती ब्रेकरसह सर्व लाईन्स देखभाल दुरुस्तीची ही कामे वर्षभर करावी लागतात. काही कामे पावसाळ्यापूर्वीही हमखास करावीच लागतात.
मात्र गेल्या तीन वर्षापासून सर्व तंत्रच बदलले आहे अपूर्ण वसुली व पुरेसा निधी नसल्याने कोट्यावधीची वसुली ग्राहकांकडे अडकून आहे. त्याचा परिणाम खर्चावर कात्री आली आहे. परंतु पावसाळ्याच्या तोंडावर काही देखभाल दुरुस्तीची कामे गरजेची असतात संबंधित ठेकेदारांना त्याचा मोबदला दोन-दोन वर्ष मिळत नसल्याने देखभालीचे काम हवे तसे होत नाही. त्याचा परिणाम दहा मिनिटे जरी पाऊस आला किंवा जोरात हवा सुटली तर संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित होतो. ही देखभाल व दुरुस्ती वेळोवेळी व्हावी जेणेकरून अखंडित वीजपुरवठा होईल, अशी मागणी वीज ग्राहकाकडून केली जात आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com