दूध संघाच्या ठरावांवरुन आघाडीच्या नेत्यांमध्ये जुंपली

दूध संघाच्या ठरावांवरुन आघाडीच्या नेत्यांमध्ये जुंपली

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (District Co-operative Milk Producers Association) निवडणुकीसाठी (election) होणारे ठराव काही नेते बाहेर गावावरुन आणून देत असल्याने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्ये (leaders) जुंपली आहे. शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील (Shiv Sena MLA Chimanrao Patil) यांनी आपल्याच गावातून ठराव दिले तरच नैतिकता असल्याची टीका केली होती. त्यावरुन राष्ट्रवादीचे नेते सतीश पाटील (NCP leader Satish Patil) व शिवसेना उपनेते पालकमंत्री गुलाबराव पाटील (Shiv Sena deputy leader, Guardian Minister Gulabrao Patil) यांनीही चिमणराव पाटील यांना प्रत्युत्तर देत टोमणे हाणले आहेत.

जे कोणी आपल्या गावातील डेअरी चालवू शकत नाहीत. ते आज आपले गाव सोडून इतर गावांमधून ठराव देत आहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते तथा आमदार चिमणराव पाटील यांनी केली होती. अनेकजण दूध डेअरीची सभासद नसतानाही, त्याठिकाणच्या लोकांना मॅनेज करून ठराव करून घेत असल्याचा धक्कादायक आरोप चिमणराव पाटील यांनी केला होता.यावर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी चिमणराव पाटील यांनी स्वत:च्या गावाचा ठराव न देता, अंबापिंप्री येथून ठराव दिला होता.

तेव्हा आपल्या गावाच्या सोसायटीचा ठराव का दिला नाही? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते डॉ. सतीश पाटील यांनी उपस्थित केला आहे. मी आतापर्यंत दूध संघाचे प्रतिनिधित्व केले नव्हते. पहिल्यांदाच दूध संघासाठी तरडी या गावाहून ठराव दिल्यामुळे चिमणराव पाटील यांना बोचल्याचा आरोपही सतिष पाटील यांनी केला आहे. चिमणराव पाटील यांचे काम म्हणजे, मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असे असल्याची टीका सतीश पाटील यांनी केली आहे.

याबाबत, माझा सहकार क्षेत्रात जसा अभ्यास पाहिजे तसा अभ्यास नाही. सहकार क्षेत्राचा आता नव्याने अभ्यास करावा लागणार आहे. आम्हालाही मागचे ठराव तपासावे लागणार असून, कोणाचे ठराव कोठून आले हे देखील तपासले जाणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. चिमणराव पाटील हे माझे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाची मी अशीच वाट पाहतो, असे म्हणत गुलाबराव पाटलांनीही आमदार चिमणराव पाटलांना अप्रत्यक्षपणे टोमणा हाणला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com