भुसावळला 49 वाहनचालकांवर ड्रंक अँन्ड ड्राईव्हची कारवाई

भुसावळला 49 वाहनचालकांवर ड्रंक अँन्ड ड्राईव्हची कारवाई

भुसावळ Bhusaval। प्रतिनिधी

31 डिसेंबरच्या रात्री 9 ते 1 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत 7 ठिकाणी नाकाबंदी (Blockade) लावण्यात आलेली होती. यात 49 वाहन चालक (vehicle driver) दारूच्या (Drunk) नशेत वाहन चालवताना मिळून आले. अशा वाहन चालकांवर पोलिसांनी मोटार वाहन कायदा (Motor Vehicle Act) कलम 185 नुसार ड्रंक अँड ड्राईव्हची (Drunk and drive action) कारवाई केली.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला तळीरामांवर करण्यात आली.यात 31 डिसेंबरच्या रात्री 9 ते 1 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आलेला होता. एकूण 7 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली होती. त्याशिवाय पोलीस पेट्रोलिंग व फिक्स पॉईंट लावण्यात आलेले होते.

सर्वसामान्य नागरिकांना नवीन वर्षाचे स्वागत हे आनंदाने व उत्साहाने करता यावे. नवीन वर्षाच्या स्वागताला कोणताही अनुचित प्रकार घडू नये. मद्यपी लोकांकडून गालबोट लागू नये. नशा केलेल्या मद्यपी चालकांकडून रस्त्यावर अपघात होऊ नये. महिला मुलींची छेडछाड होऊ नये या दृष्टीने हा संपूर्ण बंदोबस्त लावण्यात आला होता.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी 49 वाहन चालक दारूच्या नशेत वाहन चालवताना मिळून आले. अशा वाहन चालकांवर पोलिसांनी मोटार वाहन कायदा कलम 185 नुसार ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केली. याशिवाय 3 अल्पवयीन मुलांनी नशेत गाडी चालवताना मिळून आले. त्यांची वाहनेशहर वाहतूक शाखेमध्ये डिटेन करण्यात आलेली आहे. त्यांच्या पालकांवर कारवाई करून न्यायालयात खटला पाठवण्यात येणार आहे.

याशिवाय महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 84 खाली 13 व्यक्तींवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ट्रिपल सीट, विना नंबर प्लेट वाहन चालक, रॅश ड्रायव्हिंग करणारे वाहन चालक अशा वेगवेगळ्या 97 व्यक्तींवर मोटार वाहन कायद्याखाली कारवाई करण्यात आली.पोलिसांच्या या कडक भूमिकेमुळे संपूर्ण उपविभागामध्ये नवीन वर्षाचे स्वागत व शुभारंभ कोणताही अनुचित प्रकार न घडता झालेला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक पडघन, पो.नि. राहुल गायकवाड, पो.नि. विलास शेंडे, सपोनि नाईक, सपोनि गोसावी, सपोनि मंगेश गोंटला, सपोनि हरिष भोये, सपोनि वानखेडे, सपोनि अमोल पवार यांनी व पोलीस स्टेशन बाजारपेठ, पोलीस स्टेशन शहर, पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखा भुसावळ यांच्या कर्मचार्‍यांनी केली.

वरणगावात आठ जणांवर ड्रक अँन्ड ड्राईव्हची कारवाई

वरणगांव पोलीस स्टेशनकडून वर्ष अखेरच्या पार्श्वभूमीवर कायद्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी 30 व 31 डिसेबर रोजी वरणगांव येथील तिरंगा सर्कल चौकात रात्री 7 वाजेपासून नाकाबंदी करून दारू पिऊन वाहन चालविणार्‍या आठ मोटरसायकल धारकांवर कारवाई केली.

कायदा सुव्यवस्था राखावी यासाठी स.पो.नि. आशिष आडसुळ व पोउनि. परशुराम दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार किरण पाटील, हे.काँ. नावेद अली, मनोहर पाटील, रामचंद्र मोरे, योगेश पाटील, भूषण माळी, पराग दुसाने आदींनी रात्री उशीरापर्यंत नाकाबंदी केली.यामध्ये आठ जणावर कारवाई करण्यात आली.

या धडक मोहीमेत आरोपी पंकज लक्ष्मण धनगर (वय 32, रा. कळमोदा), जितेंद्र परमेश्वर भालेराव (वय 38, रा. कंडारी), अक्षय सुनील तायडे (वय 22 वामन नगर वरणगाव), दिलीप सुधाकर सपकाळे (वय 37, रा. जाडगाव), धिरज तोताराम ठाकूर (वय 32, रा.सिद्धेश्वर नगर वरणगाव), गुलाब लालचंद पालीमकर (वय 36, रा. महालक्ष्मी नगर वरणगाव) आदींवर कारवाई करण्यात आली. वरणगांव पोलीस स्टेशनला याबाबत मोटार वाहन कायदा 185 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com