भारतीय अर्थव्यवस्थेत डॉ.मनमोहनसिंग यांचे योगदान अद्वितीय - डॉ.निहारीका श्रीवास्तव

भारतीय अर्थव्यवस्थेत डॉ.मनमोहनसिंग यांचे योगदान अद्वितीय - डॉ.निहारीका श्रीवास्तव

चोपडा Chopda ( प्रतिनिधी )
कोणत्याही देशाची प्रगती (progress of the country) ही त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर (economy) अवलंबून असते.१९९० च्या पूर्वी भारतीय अर्थव्यवस्था फार अडचणीत होती. सर्वक्षेत्रीय प्रगतीचा आलेख खूप खाली घसरलेला होता.अशा काळात १९९१ मध्ये अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंग (Economist Dr. Manmohan Singh) यांनी नवीन आर्थिक धोरण (New economic policy) निर्माण करून मरगळलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी (Revival)देण्याचं उल्लेखनीय कार्य केलेले आहे म्हणून डॉ.मनमोहन सिंग यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान देशाला विसरता येणार नाही असे प्रतिपादन डॉ.निहारीका श्रीवास्तव (Dr. Niharika Srivastava) यांनी केले.

येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी "भारतीय अर्थव्यवस्था एक परीदृश्य"या विषयावर आयोजित ऑनलाईन अर्थशास्त्र परिषदेत डॉ. निहारिका श्रीवास्तव प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी. ए.सूर्यवंशी होते.यावेळी डॉ.श्रीवास्तव म्हणाल्या
भारतीय अर्थव्यवस्थेत सद्यस्थितीत भांडवली बाजाराची खूप महत्त्वाची भूमिका दिसून येत आहे.मागील दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रात बेरोजगारी वाढेल अशी शक्यता वर्तवली जात होती.मात्र शेअर मार्केट मधील गुंतवणुकीची उलाढाल खूप वाढलेली आहे. निर्देशांक ६००० च्या वर गेलेला आहे हे आपल्या अर्थव्यवस्थेतील सुचिन्ह मानायला हरकत नाही. परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक व परकीय संस्थागत गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होत आहे.

FDI व FII चे धोरणकर्ते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हेच होते.भांडवल बाजारात गुंतवणुकीचा परतावा चांगला मिळताना दिसतोय याचा अर्थ असा नव्हे की शेअर मार्केट मध्ये लगेच मध्यमवर्गीय कुटुंबीयांनी पैसे गुंतवले पाहिजे तर भांडवल बाजाराचा पूर्ण अभ्यास करून कोणत्या कंपनीचे शेअर खरेदी करावेत,किती होल्ड करून ठेवावेत व किती सेल करावेत याच विश्लेषण अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना करता आलं पाहिजे.


भांडवल बाजारात हर्षद मेहता,केतन पारीख सारख्या व्यक्तींनी सर्वसामान्य व्यक्तीच्या भावनां चा वापर करून कृत्रिम रित्या शेअरच्या किमती वाढवून करोडो रुपयांचे घोटाळे केले आहेत.अशा घोटाळ्यापासून वाचण्यासाठी अर्थशास्त्राचे विद्यार्थी म्हणून संपूर्ण प्रकियेचा अभ्यास झाला पाहिजे त्यासाठी भांडवल बाजारातील संकल्पना व त्याची व्यवहार्यता लक्षात घेतली पाहिजे असे डॉ.निहारिका श्रीवास्तव यांनी सांगितले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी,डॉ.व्ही.टी.पाटील,एन.एस.कोल्हे व डॉ.के.एन.सोनवणे उपस्थित होते. प्रास्ताविकात अर्थशास्त्र विभागप्रमुख विशाल हौसे यांनी गेल्या दोन वर्षात फक्त दोनच बाबीवर जास्त चर्चा झाली ती म्हणजे कोरोना व भारतीय अर्थव्यवस्था होय.उमवि विद्यापीठात बी ए च्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाला आणि टी वाय बीकॉम च्या अभ्यासक्रमाला भारतीय आर्थव्यवस्था हा विषय आहे.

दोन्ही अभ्यास शाखेच्या विद्यार्थ्यांना या व्याख्यानाचा लाभ मिळावा त्यांच्या अध्ययन कक्षा विस्ताराव्यात हाच अर्थशास्त्राचा हेतू असल्याचे स्पष्ट केले.प्रमुख वक्त्यांचा परिचय हौसे यांनी करून दिला.ऑनलाईन व्याख्यानाला महाविद्यालयातील अर्थशास्त्र व वाणिज्य विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षिका आशा शिंदे यांनी केले तर आभार डॉ.जी.जे.पाटील यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश मगरे वाणिज्य व व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ.चंद्रकांत देवरे,डॉ.एन.सी.पाटील व श्रीमती पी.ए.पुन्नासे यांनी सहकार्य केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com