किचन वेस्ट मधून मिळवले चारशे ग्रॅम आले

डॉ.दयाघन राणे यांनी केला आले लागवडीचा प्रयोग
किचन वेस्ट मधून मिळवले चारशे ग्रॅम आले

भुसावळ - bhusawal

येथील प्राध्यापक डॉ.दयाघन एस.राणे (Professor Dr. Dayaghan S. Rane) यांनी आले लागवडीचा प्रयोग करीत किचन वेस्टच्या माध्यमातून चारशे ग्रॅम आले मिळवण्यात यश मिळवले. जुलै 2021 मध्ये किचन वेस्ट पासून तयार केलेल्या (Compost) कंपोस्ट मध्ये आल्याच्या बियाण्यांचे तीन कंद पेरलेले होते. त्यापैकी दोन कंदांपासून तयार झालेल्या आल्याची काढणी करण्यात आली.

किचन वेस्ट मधून मिळवले चारशे ग्रॅम आले
राज सभा ; मनसैनिकांचा उत्साह शिगेला!

अशी केली लागवड

या आल्याच्या लागवड साठी एका जुन्या रांजणात किचन वेस्ट साठवले जात असे. त्यामध्ये अधून मधून झाडांची कोरडी पाने आणि पातळ शेणकाला टाकला जात असे. सुमारे तीन महिन्यात त्याचे कंपोस्ट तयार झाल्यावर त्या कंपोस्ट मध्ये फक्त दोन पस भरून माती घेतली आणि त्यात हे आल्याचे बियाणे पेरले होते.

आल्याच्या पिकासाठी पाणी खूप जास्त लागत नाही, तसेच त्याकडे नियमित लक्ष देण्याची ही गरज नसते. ते हाताळणीला ही सोपे असते म्हणून कुणीही हा प्रयोग घरी करू शकेल असा विश्वास प्रा.डॉ.दयाघन राणे यांनी व्यक्त केला. रांजणामधील तीन पैकी दोन आल्याची बेटे काढल्यावर हे चारशे ग्रॅम आले प्राप्त झाले. या दरम्यान कोणते ही रासायनिक खत वापरण्यात आले नाही. म्हणून हे आले पूर्णपणे सेंद्रिय आहे.

किचन वेस्ट मधून मिळवले चारशे ग्रॅम आले
Raj Thackeray सभेच्या विरोधात याचिका करणाऱ्याला लाखाचा दंड

रांजणात उरलेल्या एका आल्याच्या बेटा मधून काही नवीन धुमारे फुटलेले असून त्या बेटमधील आल्याचा वापर नवीन आल्याच्या बियाण्यांचे माध्यम म्हणून करायचा प्रा.डॉ.दयाघन राणे यांचा मानस आहे. त्या माध्यमातून आल्याची नवीन लागवड केल्यास नवीन धूमारे फुटण्यासाठी जो सुमारे तीन आठवड्यांचा कालावधी लागतो तो वाचणार आहे. हे आले काढल्यानंतर रांजणात जे गड्डे तयार झालेले आहेत त्यात शेणखत भरल्यानंतर ती जागा आणि खत पुढील वर्षातील आल्याच्या निर्मितीसाठी वापरता येणार आहे.

या प्रकल्पासाठी सेंद्रिय खत तयार करीत असताना प्रा.डॉ दयाघन राणे यांच्या घरातील किचन वेस्ट पाच महिने जमा करण्यात गेले. या पाच महिन्यांच्या काळात घरातील कोठलाही सेंद्रिय कचरा घंटा गाडीत टाकला गेला नाही. याचा अर्थ आपण आपल्या किचन वेस्ट कडे नवीन विषमुक्त अन्नपदार्थ निर्मितीचे साधन म्हणून पाहू शकतो आणि त्या द्वारे विषमुक्त अन्न पदार्थांची निर्मिती करू शकतो असे प्रा.डॉ.राणे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.