डॉ. आंबेडकरांचे नातू म्हणतात बौद्ध अस्मितेसाठी साहित्यातून लढाई लढण्याची गरज

डॉ. आंबेडकरांचे नातू म्हणतात बौद्ध अस्मितेसाठी साहित्यातून लढाई लढण्याची गरज

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

बहुजन समाजाला (Bahujan society) आज चुकीच्या दिशेने नेण्याचे काम व्यवस्था करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ()Dr. Babasaheb Ambedkar यांचे कार्य ठराविक वर्गाकरिता सीमित करण्याचे कार्य केले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सर्व व्यापी असून प्रत्येक भारतीयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची देण दिलेली आहे. बौद्ध अस्मितेसाठी (Buddhist identity) आपण आता साहित्याच्या (literature) माध्यमातून मोठी लढाई लढण्याची गरज आहे, असे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा रिपब्लिकन सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष (National Chairman of the Republican Army) आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.

रविवारी जळगावात तिसर्‍या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.यशवंत मनोहर होते.

या विचारमंचावर डॉ. अरविंद आलोक, डॉ.प्रदीप आगलावे, डॉ.धनराज डाहट, साहित्य संमेलन राज्य समन्वय समिती अध्यक्ष मुकूंद सपकाळे, बुलढाण्याचे दिलीप जाधव, अ‍ॅड. राजेश झाल्टे, डॉ.माधवी खरात, जयसिंग वाघ, पंढरीनाथ गायकवाड, अरविंद खैरनार, डी.के.अहिरे, सुरेंद्र पाटील, विश्वासराव पाटील, सुधाकर बडगुजर, प्रा.शिवाजीराव पाटील, स्वागताध्यक्ष प्रा.भरत शिरसाट,प्रा.सतीश मोरे,प्रा.संदीप कोतकर,रणजित सोनवणे,संजय निकम,बी.टी.सपकाळे, शालीग्राम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

आनंदराज आंबेडकर पुढे म्हणाले की, दलित साहित्य आणि बौद्ध साहित्य या मधला मूलभूत फरक उपस्थितांसमोर सविस्तरपणे मांडला. दलित या संकल्पनेपासून आता आपण स्वतःची सुटका करून घेतली असून बौद्ध अस्मितेसाठी साहित्यिकांनी आता परिवर्तनाची लढाई लढली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com