विकास कामांना स्थगिती आणायचा करंटेपणा करू नका - खडसे

विकास कामांना स्थगिती आणायचा करंटेपणा करू नका - खडसे

मुक्ताईनगर Muktainagar । वार्ताहर

मतदारसंघातील विकास कामांसाठी (Development works) मी सदैव शासनाकडे भांडलो असून त्या माध्यमातून मतदार संघातील सर्व समाजाचा विकास हेच माझे ध्येय आहे. परंतु शासन दरबारातून मतदार संघाच्या विकासाची कामे मंजूर करून आणल्यानंतर त्यांना आज विद्यमान आमदारांकडून विरोध (Opposition from existing MLAs) होत आहे. आ.चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे मागणी करत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडून मंजूर करून आलेल्या कामांना स्थगिती देऊन एक प्रकारे विविध समाजांच्या विकास कामांना स्थगिती दिली असून हा एक प्रकारचा जातिवाद असून या जातीवादी धोरणाचा (racist policy) मी तीव्र शब्दात निषेध करत आहे, असे माजी मंत्री एकनाथराव खडसे (Former Minister Eknathrao Khadse) यांनी मुक्ताईनगर येथील त्यांच्या फार्महाऊसवर आयोजित पत्रकार परिषदेत केला.

मुक्ताईनगर येथील खडसे यांच्या फार्महाऊस येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी सांगितले की, आमदारांनी विशेषतः माझी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे (Chief Minister) केली आहे. मी 217 कोटी रुपयांची कामे मतदारसंघात मंजूर करून आणली आहेत. त्यातील मूलभूत सुविधांसाठी दहा कोटी रुपये, मुक्ताईनगर नगरपंचायत साठी पाच कोटी रुपये, मुक्ताईनगर व बोदवड नगरपंचायत अंतर्गत अल्पसंख्यांक शादीखाना हॉल साठी प्रत्येकी एक कोटी रुपये, दलित वस्ती सुधारणेसाठी दोन कोटी 20 लाख रुपये, मुक्ताईनगर ते पिंपरी अकराऊत या रस्त्यासाठी दोन कोटी 67 लक्ष रुपये, कुंड धरणासाठी दीड कोटी रुपये, बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी 100 कोटी रुपये, कुर्‍हा वडोदा उपसा सिंचन योजनेसाठी 50 लाख रुपये, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेसाठी 25 लक्ष रुपये, मुक्ताई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाच कोटी रुपये, मुक्ताईनगर वाटर पार्क साठी पाच कोटी रुपये, अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविद्यालय साठी चार कोटी रुपये, तसेच मुक्ताईनगर व बोदवड नगरपंचायत अंतर्गत मागासवर्गीयांसाठी संविधान सभागृहासाठी दोन कोटी 48 लाख रुपये मंजूर केले होते. त्यामध्ये लायब्ररी वाय-फाय सुविधा यासह विविध सुविधा होत्या. अशा एकूण 217 कोटी रुपयांची कामे (Works worth Rs 217 crore) आपण मंजूर केले होते.

यामध्ये तेली समाजासाठी 50 लाख रुपये, लेवा पाटील समाजासाठी 50 लाख रुपये, बंजारा समाजासाठी मोर्झिरा येथे 15 लाख रुपये, एवढेच नव्हे तर मागासवर्गीयांसाठी संविधान सभागृह मुस्लिमांसाठी शादीखाना हॉल अशा विविध समाजांचा या विकास निधी मध्ये समावेश असताना आमदारांनी स्थगिती (Postponement by MLAs) देण्याचा करंटेपणा केला असून हा एक प्रकारचा जातिवाद असल्याचा आरोप त्यांनी याप्रसंगी केला.

एकीकडे गिरीश महाजन शिवसेनेला गटारातील बेडूक उपमा देतात आणि दुसरीकडे आमदार त्यांचा सत्कार करतात असा आरोप त्यांनी केला.

आ. पाटील हे आपण शिवसेनेचे आमदार (Shiv Sena MLA) आहोत असे प्रत्येक वेळेस जाहीर सांगत आहेत. माझे त्यांना आव्हान आहे की, त्यांनी विधान मंडळांमध्ये किंवा जिल्हाधिकार्‍यांकडे साध्या दोन ओळीचे पत्र लिहून मी शिवसेनेचा आमदार आहे असे सांगावे, स्पर्धा विकासाची करा, मी 200 कोटी आणले तुम्ही 500 कोटी आणून दाखवा, स्थगिती आणायचा करंटेपणा करू नका.

या मतदारसंघात अधिकारी यायला तयार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मी पाच पूल करून दाखवले तुम्ही किमान शेमळदा येथे तापी नदीवरील तुम्हीच आश्वासन दिलेला एक पूल करून दाखवावा असे आव्हानही माजी मंत्री खडसे यांनी आ.चंद्रकांत पाटील यांना दिले. आपल्याच मतदारसघातील मंजूर करून आणलेल्या विकास कामांमध्ये अडथळा आणून करंटेपणा करू नका असे विद्यमान आमदारांना आवाहनही माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.

खडसेंचा आरोप दिशाभूल करणारा

मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रासाठी आलेला 217 कोटींचा निधी थकित करण्यात आल्याचा आरोप माजी मंत्री खडसे यांनी केलेला आहे तो अतिशय दिशाभूल करणारा व चुकीचा असून केवळ 25/15 चा केवळ पाच कोटी रुपयांच्या निधी च स्थगिती मिळाली आहे. मतदार संघातील सर्व समाजासाठी विकास कामे आणण्याची माझी जबाबदारी आहे आणि मी ती अथक प्रयत्नाने पार पडेल असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे मोठे व अभ्यासू नेते आहेत त्यांनी तीस वर्षे मोठमोठी पदे भूषविली परंतु तरीही 30 वर्षात मतदार संघाचा विकास का होऊ शकला नाही ? असा सवाल उपस्थित करत मी किंवा मुख्यमंत्र्यांनी कोणत्या 217 कोटी रुपयांच्या निधीला स्थगिती दिली ते सांगावे तसेच एकनाथराव खडसे यांनी त्या 217 कोटी रुपयांची कोणती कामे मंजूर केली याची यादी जाहीर करावे असे आव्हानही आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे त्यासोबतच आमदारांनी एक पूल तरी बांधून दाखवा वा असे माजी मंत्री खडसे यांनी आव्हान दिले आहे तर माजी मंत्री खडसे यांना पूल बांधण्याचा दांडगा अनुभव आहे त्यामुळे भविष्यात पूल बांधण्यासाठी त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा व अनुभवाचा आमदार चंद्रकांत पाटील यांना लाभ मिळवून द्यावा ज्या दिवशी एकनाथराव खडसे यांना माझा सत्कार करण्याची इच्छा होईल त्या दिवशी मी त्यांच्या घरी सत्कार स्वीकारण्यासाठी जाईल असेही आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com