विनोदातून प्रेक्षकांना हसवत असतांना इतरांच्या भावना दुखावू नका : अभिनेते समीर चौघुले

विनोदातून प्रेक्षकांना हसवत असतांना इतरांच्या भावना दुखावू नका :  अभिनेते समीर चौघुले

चोपडा Chopada ( प्रतिनिधी )
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनेत (event that happens) घडत असलेला विनोद (joke) बघण्यासाठी तिसरा डोळा असावा लागतो. प्रत्येकाच्याच आयुष्यात (life) विनोद दडलेला असतो कारण विनोद आपल्या पाचवीला पुजलेला आहे. विनोदाचे (joke) विषय आपल्या दैनंदिन जीवनातच असतात. आम्ही विनोदी कलावंत (Comedy artist) हेच हेरून आमच्या सादरीकरणातून मांडत असतो. आपल्याकडे होणारे लग्न सोहळे (Wedding ceremonies) हे विनोदासाठी खूप मोठा स्त्रोत आहेत. नशीब फळफळणं, प्रेम मिळणं,नवीन नाती जुळणं हे काय असतं हे हास्य जत्रेमुळे (Comedy fairs) शिकायला मिळाले. सोनी टीव्ही वरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ('Maharashtra's Comedy Fair') कार्यक्रमामुळे मी आणि आमची टीम सेलिब्रिटी नाही पण प्रत्येकाच्या घरा-घरातला भाग (House-to-house part) मात्र बनलो याचा जास्त आनंद आहे. विनोदातून (joke) प्रेक्षकांना हसवत असतांना इतरांच्या भावना दुखावू (Hurt feelings) नका ! काळजी घ्या असे निखळ विचार सुप्रसिद्ध मराठी हास्य अभिनेते समीर चौघुले (Actor Sameer Chowghule) यांनी व्यक्त केले.

चोपडा येथील प्रेरणा दर्पण फाउंडेशन (Inspiration darpaṇa Foundation) आनंदराज लॉन्सवर आयोजित " दर्पण पुरस्कार - २०२२ " (Darpaṇa Award) वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून समीर चौघुले बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी (Prof. Arunbhai Gujarathi) होते.

विनोद निर्मिती सोपी नसते चार्ली चॅप्लिन,पु.ल.देशपांडे, रोवन ॲटकिन्सन (मिस्टर बिन) हे आपले आदर्श असून निखळ मनोरंजन (Nice entertainment) व प्रेक्षकांच्या जीवनाशी नाते (Relationship to the life of the audience) जोडणारे विनोद आणि हसने सादर करून माझा लेखना कडे आपला कल असतो. हास्यजत्रा कार्यक्रमामुळे विविध क्षेत्रातले व भागातले अनेक चाहते मिळाले.भारतरत्न स्व. लता मंगेशकर, महानायक अमिताभ बच्चन, डॉ.विकास आमटे यांच्या सारख्या महनीय व्यक्तींनी मनापासून कौतुक केले आहे.प्रेरणा दर्पण फाउंडेशन (Inspiration darpaṇa Foundation) करीत असलेले कार्य निश्चितच अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे. समाजातील गुणवंत हेरून त्यांचा सत्कार करणे,कोरोना काळात मोफत अन्न सध्या सुरू असलेला अन्नसेवेच्या उपक्रमांमुळे समाजात एकोपा (Unity in society) निर्माण होत असतो.

आम्ही कलावंत (Artist) विनोदातून समाजाच्या चेहर्‍यावर हास्य (smile on his face) फुलवतो तर प्रेरणा दर्पण सारख्या संस्था त्यांच्या कार्यातून हास्य फुलवीत आहेत असे मराठी हास्य अभिनेते समीर चौघुले (Actor Sameer Chowghule) यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्रा.अरुणभाई गुजराथी यांनी प्रारंभी समीर चौघुले यांचे शहर वासियांतर्फे स्वागत करून,जो कधी हसला नाही त्याला जीवन (life) कळले नाही. हास्यामध्ये (smile) धैर्य,शौर्य आणि औदार्यही असते हास्य जगण्याचा खुराक आहे.प्रेरणा दर्पण फाउंडेशनचा सोहळा हा एकमेवाद्वितीय आहे. विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यासाठी प्रेरणा दर्पण फाउंडेशन (Inspiration darpaṇa Foundation) मुळेच नामवंत व्यक्तिमत्त्व आपल्या शहरात येत असल्याचे सांगितले.

या प्रसंगी माजी आमदार कैलास पाटील,नगराध्यक्षा मनीषा चौधरी,प्रेरणा दर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष शामकांत जाधव,उपाध्यक्ष डॉ. निर्मल टाटीया हे मंचावर उपस्थित होते.याप्रसंगी डॉ.निर्मल टाटीया व पुरस्कारार्थी तथा रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज बोरोले यांनी मनोगत व्यक्त केले.

दर्पण पुरस्कार -२०२२ चे मानकरी


कु.स्वराली पंकज पाटील, डॉ.प्रवीण दत्तात्रय चौधरी, रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज सुरेश बोरोले ॲड.संजय सरदारसिंग पावरा, वैभव दत्तात्रय शिंदे, उमेश शामराव बोरसे, सुभाष मदनलाल अग्रवाल,प्रकाश फुलचंद चौधरी,दत्तात्रय दयाराम पाटील,प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ.पवन डोंगर पाटील , आशा नामदेव सोनवणे,भूषण कांतीलाल बाविस्कर,सय्यद अमजदअली,योगेश मधुकर सोनवणे,विष्णू अर्जुन दळवी,नगरसेविका संध्या नरेश महाजन, शिवाजी अण्णा पाटील, पीपल्स बँकेचे संचालक नेमीचंद सुकलाल जैन, दिनेश चंपालाल पाटील,नरेंद्र रायसिंग भादले, किरण शालीग्राम पाटील, अरुणा रामदास कोळी, सचिन फुलचंद चौधरी, मोहन बाबुलाल बागमार,नितीन प्रभाकर सपके तर दर्पण जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी रमेशकुमार बिरदीचंद मुणोत यांना हास्य अभिनेते समीर चौघुले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत दर्पण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.शाल,स्मृतिचिन्ह,गौरवपत्र व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

नगर पालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे (Municipal Corporation Chief Officer Avinash Gangode) व पालीवाल टेन्ट हाऊसचे प्रदीप पालीवाल यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

बहारदार कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय बारी व योगिता पाटील यांनी केले तर प्रास्ताविक शामकांत जाधव यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी मनोज चित्रकथी,विवेक बाविस्कर,विजय पालीवाल,निलेश कुंभार यांच्या चमूने ईशस्तवन सादर केले.

कार्यक्रमासाठी प्रेरणा दर्पण फौंडेशन चे सचिव लतिष जैन,हितेंद्र साळी,विश्वास वाडे, चेतन टाटीया,आकाश जैन,निलेश जाधव, अतुल पाटील,ॲड.अशोक जैन,लता जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी प्रदीप जैन (मिलाप स्टोअर्स), हर्षल मकवाना (मकवाना इंजिनिअर्स) डॉ.दीपक पाटील,डॉ.दिलीप पाटील (श्री नृसिंह हॉस्पिटल), प्रदीप पालीवाल,राजेंद्र माळी,स्वप्नील महाजन यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com