राजकारण्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या भानगडीत पडू नका

डॉ.नेमाडे यांचे प्रतिपादन;डॉ.किसन पाटील वाङ्मय पुरस्काराचे वितरण
राजकारण्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या भानगडीत पडू नका

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राजकारण्यांनी (politicians) भारत-पाकिस्तानची फाळणी (India-Pakistan partition) केली आणि त्यामुळेच आपण विभागले गेलो. वस्तुतः आपण सर्व एक आहोत.राजकारणी क्रांती करू शकत नाहीत. आम्ही क्रांती करतो आहोत, असं ते दाखवतात. परंतु ते कशाची विभागणी (partition)) करतील याचा भरवसा नाही. त्यामुळे राजकारण्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या (nationality)भानगडीत पडू नका. आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर साहित्य आणि सांस्कृतिक स्तरावर आपण मूलभूत स्वरूपाचे काम (Basic work) केले पाहिजे,असे मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे (Dnanpith Award winner Senior Literary Dr. Bhalchandra Nemade) यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेच्यावतीने मुळजी जेठा महाविद्यालयात आयोजित केलेल्या प्राचार्य डॉ. किसन पाटील वाङ्मय पुरस्कारांचे वितरण पद्मश्री भालचंद्र नेमाडे यांच्याहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना. भारंबे होते.

या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष शंभू पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव शाखेचे डॉ.अशोक कौतिक कोळी, प्रभात चौधरी, युवराज माळी, माया धुप्पड, मोरेश्वर सोनार, गोपीचंद धनगर, शशिकांत हिंगोणेकर,डॉ. सत्यजित साळवे, सुकन्या प्रतिमा पंकज आदी उपस्थित होते. डॉ.किसन पाटील यांचे साहित्यिक योगदान हे महत्त्वाचे आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सुरु केलेला हा कार्यक्रम स्तुत्य आहे असेही उद्गार त्यांनी काढले.

पुणे येथील मनोहर शहाणे यांच्या ‘ब्रँड फॅक्टरी’ या कथासंग्रहासाठी त्यांना भालचंद्र नेमाडे यांच्याहस्ते प्राचार्य डॉ.किसन पाटील राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार देऊन सन्मानित केले. शाल, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, अकरा हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्राचार्य डॉ.किसन पाटील खानदेशस्तरीय वाङ्मय पुरस्कार डॉ. युवराज पवार यांच्या ‘शिकार’ या कथासंग्रहासाठी त्यांना देण्यात आला.

परीक्षण कवी अशोक कोतवाल यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सत्यजित साळवे यांनी केले. आभार डॉ. योगेश महाले यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com