
दहिगाव Dahigaon ता. यावल
येथून जवळच असलेल्या सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रा (Sawkheda SIM Primary Health Center) सह तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच यावल ग्रामीण रुग्णालयात (Yaval Rural Hospital) गेल्या दोन महिन्यापासून औषधांचा (Shortage of medicines) तुटवडा जाणवत आहे.
औषधे नसल्याने रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. वाढत्या तापमानात ओ आर एस, पॅरासिटामॉल अशा अनेक अत्यावश्यक औषधींची गरज निर्माण झालेली आहे. रुग्णांना या औषधी मिळत नसल्याने त्यांना खासगी औषधी दुकानांमधून त्या विकत घ्याव्या लागत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात तर गेल्या तीन ते चार महिन्यापासून या औषधींची कमतरता आहे. त्यामुळे परिचारीकांसह डॉक्टर सुद्धा त्रस्त झालेले आहेत. रुग्णांना काय उत्तर द्यावे हे त्यांना कळत नसल्याने नाराजी व्यक्त करीत आहेत.
जिल्हा परिषद तसेच शासनाने याकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. वाढत्या तापमानात प्रत्येक नागरिकाला ओ आर एस या औषधीची फार मोठ्या प्रमाणात गरज असते आणि तिचाच गेल्या तीन महिन्यापासून तुटवडा निर्माण झालेला असल्याचे जाणवत आहे यासह अनेक गोळ्या व पातळ औषध सुद्धा येथे उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अनेक सुविधा निर्माण झालेले आहेत. मात्र त्या सुविधांबरोबर औषधांंची कमतरता निर्माण झालेली असल्याने डॉक्टर हतबल होत आहेत. याकडे मात्र आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.