
जामनेर Jamner -प्रतिनिधी
तालुक्यातील पहूर ग्रामीण रुग्णालयातील (Pahur Rural Hospital) वैद्यकीय अधिकारी (Doctors) डॉ. जितेंद्र प्रल्हाद वानखेडे यांनी दिनांक 2 जून 2021 रोजी रात्री साडेबारा वाजता रुग्णालयात जाऊन महिला सहकारी अधिकाऱ्याचा विनयभंग (Debauchery) केला .याप्रकरणी पीडितेने पहूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता .या खटल्याचा निकाल आज न्यायाधीश (Judge) डी .एन.चामले यांनी दिला असून आरोपी डॉक्टर (accused doctor) जितेंद्र वानखेडे यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा (Punishment of hard labor) व पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.
पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात पीडित महिला वैद्यकीय अधिकारी (Female Medical Officer) ही दिनांक 2 जून 2021 रोजी ग्रामीण रुग्णालयात रात्री कर्तव्यवर असताना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर (Doctors) जितेंद्र वानखेडे याने त्याची ड्युटी नसताना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास रूग्णालयात येऊन पिडीत रूममध्ये आराम करत असलेल्या खोलीचा दरवाजा ठोकून तिला दार उघडण्यास सांगून माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. म्हणून तुला रोस्टेड चिकन आणले असे म्हणून तिला चिकन खाण्यासाठी आग्रह करीत होता.
डॉक्टर वानखेडे हा दारूच्या नशेत असल्याने सदर पीडितेने चिकनचे पार्सल घेऊन आतून दरवाजा लावून घेतला. मात्र थोड्या वेळाने पुन्हा डॉक्टर वानखेडे याने रात्री एक वाजेच्या सुमारास फोन करून व्हाट्सअप वर यायला सांगितले व पीडित महिलेला रात्रभर दारू पिण्यासाठी आग्रह करीत होता .वारंवार मेसेज करून त्रास देत होता. सदर पीडित महिलेचा त्याने विनयभंग (Debauchery) केल्याने महिलेने पहूर पोलिस स्टेशनला विनयभंगाची तक्रार दाखल केली होती .
सदरचा खटला न्यायाधीश डी.एम. चामले यांचे समोर चालून सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार (Witness) तपासण्यात आले .गुन्ह्याचा तपास तत्कालीन पो.ऊ.नि. अमोल देवठे यांनी केला होता. सरकार पक्षातर्फे सौ. कृतिका भट यांनी भक्कम युक्तिवाद केला. पो.हे. का. मनोज बाविस्कर व केस वाच राजेंद्र परदेशी यांनी या कामी मदत केली.