अश्लिल व्हिडीओ कॉल अन् ब्लॅकमेलिंग करत डॉक्टरला गंडविले

पोलीस अधीक्षकांकडे आपबिती कथन केल्यावर चौकशीसाठी यंत्रणा लागली कामाला
अश्लिल व्हिडीओ कॉल अन् ब्लॅकमेलिंग करत डॉक्टरला गंडविले

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

अमळनेर शहरातील एका डॉक्टरशी फेसबुकवर मैत्री करत त्याच्यासोबत अश्लिल व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून चॅटींग करुन, याच आधारावर ब्लॅकमेलिंग करत गंडविल्याचा प्रकार आज सोमवारी समोर आला आहे. डॉक्टरने याबाबत वेळीच पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर यंत्रणा कामाला लागल्याने पुढील मोठी फसवणूक टळली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील एका डॉक्टरची फेसबुकवर एका महिलेशी मैत्री झाली. मैत्रीतून डॉक्टर व महिलेमध्ये व्हाट्सअपवर संवाद सुरु झाला. या दरम्यान महिलेने डॉक्टरला एकेदिवशी व्हिडिओ कॉल करून अश्लील वर्तन केले.

डॉक्टरनेही तिला प्रतिसाद दिला. सदरच्या प्रकराचा व्हिडीओ सेव्ह करुन अश्लिल व्हिडीओच्या आधारावर ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली. माझ्या बॅक खात्यावर तात्काळ तीन हजार रुपये पाठवा नाही तर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

घाबरलेल्या डॉक्टरने दीड हजार रुपये पाठवले. आपली फसवणूक होत असल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉक्टरने फेसबुक खाते बंद केले.

तसेच सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. तेथे घडलेला प्रकार कथन केला. हा प्रकार पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या कानावर गेला.

त्यांनी चौकशीसाठी एक यंत्रणा कामाला लावली. चौकशीत डॉक्टरने ज्या बॅक खात्यावर पैसे पाठवले ते पांडेचेरी येथील असल्याची माहिती मिळाली असून पुढील चौकशी सुरु आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com