....अन् महिलेसह जुळ्या बाळांना डॉक्टरांनी दिला पुनर्जन्म

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय पथकाचे यश
....अन् महिलेसह जुळ्या बाळांना डॉक्टरांनी दिला पुनर्जन्म

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शेतात असताना अचानक गर्भवती महिलेला (pregnant woman) कळा सुरु झाल्याने कुटुंबीयांची धावपळ सुरु झाली. मात्र दवाखान्यात (hospital) पोहोचण्यापूर्वीच महिलेची प्रसूती होवून त्या महिलेने जुळ्या बाळांना जन्म (birth of twins) दिला. परंतु प्रसुतीवेळी अतिरक्तस्त्राव सुरु झाल्याने बाळासंह महिलेची प्रकृती चिंताजनक (nature is worrisome) होती. अशा परिस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या अथक परिश्रमानंतर तिचा जीव वाचविण्यात यश आल्याने त्या महिलेसे त्या चिमुकल्यांना पुर्नजन्म मिळाला.

धरणगाव तालुक्यातील उखडवाडी येथील केवलबाई साहिदास भिल (वय 26) असे या महिलेचे नाव आहे. त्यांचे कुटुंब मजुरी करते. पाचव्यांदा या महिलेची प्रसूती होती. यापूर्वी 2 मुली व 2 मुले असून पाचव्या प्रसूतीमध्ये तिला दोन्ही मुली झाल्या आहेत. दि. 5 जानेवारी रोजी कुटुंबियांसह शेतात असताना केवलबाईला प्रसूतीकळा सुरु झाल्या. कुटुंब हालचाल करून वाहन आणतील तत्पूर्वीच महिलेची प्रसूती सुरु झाली. शेतातच सदर महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र प्रसूतीमुळे महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक होऊन बेशुद्ध झाली. कुटुंबीयांनी थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिला रात्री 9 वाजेच्या सुमारास दाखल केले.

महिलेचे हृदयाचे ठोकेदेखील लागत नव्हते. खूप रक्तस्राव झाल्याने प्रकृती चिंताजनक होती. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे, सहयोगी प्रा. डॉ. नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जितेंद्र कोळी, डॉ. कांचन चव्हाण यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करून महिलेचा जीव वाचविण्यासाठी गर्भपिशवी काढली आणि त्यामुळे महिलेचा जीव वाचला.

समयसुचकता दाखविल्यमुळे वाचला जीव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दखल केल्यानंर उपचार सुरु असतांना त्या महिलेला 6 रक्ताच्या पिशव्या आणि 2 पांढर्‍या पेशींच्या पिशव्या लावण्यात आल्या. चार दिवस अतिदक्षता विभागात उपचार केल्यानंतर रविवारी जनरल कक्षात या महिलेला वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली ठेवले आहे. समयसूचकता ठेवून महिलेचा जीव वाचविणार्‍या वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी कौतुक केले आहे.

यांनी केले उपचार

उपचार करण्याकामी डॉ. शलाका पाटील, डॉ. सोनाली मुपाडे, डॉ. चंदन महाजन, डॉ. राजश्री येसगे, डॉ. विनेश पावरा, बधिरीकरण विभागाचे डॉ. हर्षद, डॉ. स्वप्नील इंकने, शस्त्रक्रियागृह इन्चार्ज परिचारिका सोनाली पाटील, अतिदक्षता विभागाच्या इन्चार्ज परिचारिका राजश्री आढाळे यांनी त्या महिलेवर उपचार करुन त्या महिलेचा जीव वाचविला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com