वरणगाव फॅक्टरीतील घटस्फोटीत महिलेची तापी नदीत आत्महत्या

वरणगाव फॅक्टरीतील घटस्फोटीत महिलेची तापी नदीत आत्महत्या

वरणगाव फॅक्टरी, Varangaon Factory ता. भुसावळ । वार्ताहर

येथील आयुध निर्माणी वसाहत (Ordnance Manufacturing Colony) मधील 32 वर्षीय महिलेने (Divorced woman) हतनूर जवळ तापी नदी पुलावरून (Tapi River Bridge) उडी घेऊन आत्महत्या (Suicide by jumping) केल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की वरणगाव फॅक्टरी वसाहत मधील क्वॉर्टर नं 176 मोडीफाईडमध्ये राहणारी प्रिया सतीश वाणी (वय 32) यांनी हतनुर धरणाजवळ असलेल्या तापी नदीच्या पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यावेळी काही नागरिकांनी उडी घेतांना बघितले असता तिला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तिला बाहेर काढण्यापूर्वीच ती मयत झालेली असल्याचे समजले.

प्रिया ही घटस्फोटीत असून घटस्फोटामुळे तिच्या वागण्यामध्ये परिणाम झालेला असल्याचे समजते. ती तिच्या आई, वडील व दोन भावांसोबत राहत असून. तिचे वडील अडीच महिन्यापूर्वी फॅक्टरीमधुन सेवानिवृत्त झालेले आहे.

सदर घटनेची वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास स.पो.नी आशिष कुमार अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार चव्हाण करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com