भाजपच्या २७ नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस

बंडखोर गटनेते ऍड. दिलीप पोकळे, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दाखल केली अपात्रतेसाठी याचिका
भाजपच्या २७ नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस

जळगाव |jalgaon

महानगरपालिकेच्या (Corporation) प्रभाग समिती सभापती निवडणुकीसाठी (Ward Committee Chairman Election) भाजपचे बंडखोर नगरसेवक (BJP's rebel corporator) तथा गटनेते ऍड. दिलीप पोकळे (Adv. Dilip Pokale) आणि उपमहापौर कुलभूषण पाटील (Deputy Mayor Kulbhushan Patil) यांनी भाजपच्या २७ नगरसेवकांना (corporators) पक्षादेश (व्हीप) (Party orders) बजाविला होता. या पक्षादेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरुन विभागीय आयुक्तांकडे (Divisional Commissioners) भाजपच्या संबंधित नगरसेवकांना अपात्र करण्याबाबत ऍड. पोकळे आणि उपमहापौर पाटील यांनी याचिका दाखल केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी संबंधित भाजपच्या नगरसेवकांना सात दिवसाच्या आत आपले म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस (Notice) बजाविली आहे.

जळगाव महानगरपालिकेत भाजपची अडीच वर्ष सत्ता होती. भाजपच्या ५७ नगसेवकांपैकी २७ नगरसेवकांनी बंडखोरी करीत शिवसेनेला पाठींबा दिला. त्यामुळे भाजपाला अडीच वर्षातच बहुमतातल्या सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले. दरम्यान, महापौर, उपमहापौर निवडणुकीत बंडखोर नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केल्यामुळे संबंधित २७ बंडखोर नगरसेवकांविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे अपात्रतेसाठी याचिका दाखल केली.

याच कालावधीत बंडखोर नगरसेवकांनी ठराव करुन गटनेतेपदी ऍड. दिलीप पोकळे, उपगटनेतेपदी चेतन सनकत तर प्रतोद म्हणून उपमहापौर कुलभूषण पाटील यांची निवड केली गेली. त्यानंतर महानगरपालिकेत प्रभाग समिती सभापतींची निवडणूक झाली. या निवडणूकीसाठी ऍड. पोकळे आणि उपमहापौर पाटील यांच्या स्वाक्षरीने भाजपच्या २७ नगरसेवकांना पक्षादेश बाजाविण्यात आला.

मात्र भाजपच्या नगरसेवकांनी बंडखोर गटनेत्याचा पक्षादेश स्वीकारला नाही. त्यामुळे भाजपच्या २७ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करावी. त्यासाठी बंडखोर नगसेवकांचे गटनेते ऍड. पोकळे आणि उपमापौर पाटील यांनी विभागयी आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेवून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भाजपच्या २७ नगरसेवकांना आपले म्हणणे सात दिवसाच्या आत मांडण्यासाठी नोटीस बजाविली आहे.

भाजपच्या या नगरसेवकांना बजावली नोटीस

भाजपचे २७ नगरसेवकांना विभागीय आयुक्तांनी नोटीस बजाविली आहे. यात सीमा भोळे, दीपमाला काळे, अश्‍विन सोनवणे, लताताई भोईटे, चंद्रशेखर पाटील, भारती सोनवणे, चेतना चौधरी, मूकुंदा सोनवणे, भगत बालाणी, रजनी अत्तरदे, रंजना सोनार, विश्‍वनाथ खडके, सुरेखा तायडे, अमित काळे, मंगला चौधरी, ऍड. शुचिता हाडा, धीरज सोनवणे, जितेंद्र मराठे, अंजनाबाई सोनवणे, सदाशिव ढेकळे, राजेंद्र पाटील, उषा पाटील, मयूर कापसे, प्रतिभा कापसे, विजय पाटील, उज्वला बेंडाळे, गायत्री राणे यांचा समावेश आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com