जिल्ह्यातील 10 पोलीस स्थानकांचे विभाजन-पो.अ.एम.राजकुमार

जिल्ह्यातील 10 पोलीस स्थानकांचे विभाजन-पो.अ.एम.राजकुमार

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

जिल्ह्यातील 10 पोलीस स्थानकांचे विभाजन करण्याचा निर्णय जिल्हा पोलिस प्रशानाने घेतला आहे. यात नवीन स्थानके वा दूरक्षेत्र यांची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबत सोमवारी 13 मार्च रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयात बैठक घेवून प्रस्तावासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी शुक्रवारी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील बर्‍याच पोलीस स्थानकांवर कामाचा अधिक ताण असल्याने त्यांचे विभाजन करण्यात यावे, अशी मागणी अनेक महिन्यांपासून केलेली होती. या अनुषंगाने आता जिल्ह्यातील 10 पोलीस स्थानकांचे विभाजन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यानुसार अमळनेर पोलीस स्थानकाचे विभाजन करून शहर आणि ग्रामीण असे दोन पोलीस स्टेशन्स होणार आहेत. जळगावातल्या एमआयडीसी स्टेशनचे विभाजन होणार असून म्हसावद येथे नवीन पोलीस ठाणे, जळगाव शहरचे विभाजन होऊ छत्रपती शिवाजी महाराज नगरसाठी नवीन स्टेशन कार्यरत होणार आहे. पाचोर्‍याचे विभाजन होऊन नगरदेवळा येथे नवीन ठाणे होणार आहे. तर पारोळ्याचे विभाजन होऊन तामसवाडी येथे पोलीस ठाणे होणार आहे.

मुक्ताईनगर पोलीस स्थानकाचे विभाजन होऊन कुर्‍हा-काकोडा, तर पहूरचे विभाजन होऊन शेंदुर्णी येथे नवीन ठाणे बनणार आहे. भडगावचे विभाजन होऊन कजगाव येथे पोलीस दूरक्षेत्र बनणार आहे. निंभोर्याचे विभाजन होऊन ऐनपूर येथे तर मेहुणबार्‍याचे विभाजन होऊन पिलखोड येथे पोलीस दूरक्षेत्र होणार आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com