‘माझी वसुंधरा’ अभियानात जिल्ह्याचा राज्यस्तरावर होणार गौरव

‘माझी वसुंधरा’ अभियानात जिल्ह्याचा राज्यस्तरावर होणार गौरव

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

माझी वसुंधरा अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत निसर्गाशी संबंधीत पंचतत्वावर आधारीत स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेअंतर्गत जिल्ह्यातून चिनावल ता.रावेर व पहूर ता. जामनेर या ग्रामपंचायतींची राज्यस्तरावर निवड करण्यात आलेली आहे.

या निवड झालेल्या गावांचा जागतिक पर्यावरणदिनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 5 जून रोजी दूपारी 12.30 वाजता ऑनलाईन पध्दतीने सन्मान सोहळा होणार आहे.

सन 2020-21 मध्ये भूमी, जल, वायु, अग्नी, आकाश या निसर्गाशी संबंधीत ही स्पर्धा घेण्यात आली होती. यात सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील हे सन्मान स्विकारणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com