
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
अवैध सावकारांच्या (illegal lenders) पाशात अडकलेल्या 15 शेतकर्यांच्या (farmers) जमिनी मुक्त (land free) करून त्या त्यांना परत मिळवून (Retrieving) देणारे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई (District Deputy Registrar Santosh Bidwai)यांचा राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे (State Co-operation Minister Atul Save) यांच्या हस्ते गौरव (Honored) करण्यात आला.
रावेर आणि यावल तालुक्यातील नंदकुमार मुकुंदा पाटील, मुरलीधर तोताराम भोळे, मुरलीधर काशिराम राणे, सुदाम तुकाराम राणे, मधुकर तुकाराम राणे, श्रीधर गोपाळ पाटील, मधुकर वामन चौधरी, मुरलीधर सुदाम राणे या आठ अवैध सावकारांनी 15 शेतकर्यांच्या जमिनी बळकावल्या होत्या.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी या प्रकरणाची पाळेमुळे खोदली. सखोल चौकशी आणि सुनावणी अंती दि. 30 नोव्हेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी अवैध सावकारी घोषित करून 15 शेतकर्यांना त्यांच्या जमिनी परत करण्याचा ऐतिहासिक आदेश दिला. या आदेशाने गरीब शेतकरी कुटूंबाच्या घरात आनंदाला पारावार उरला नाही.
सहकार मंत्र्यांकडून स्तुतीसुमने
शेतकर्यांना त्यांच्या हक्काची जमिन परत मिळवून देण्यात जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिलेला आदेश हा सहकार विभागाची प्रतिमा उंचावणारे काम असल्याचे गौरवोद्गार राज्याचे सहकार मंत्री ना. अतुल सावे यांनी काढले. याप्रसंगी ना. सावे यांनी जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव देखिल केला.