
जळगाव - jalgaon
डीपीडीसी (dpdc) अंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांच्या निर्देशानुसार जिल्हा पोलीस (police) दलाच्या बळकटीकरणासह आपले पोलीस संकल्पनेच्या माध्यमातून ११२ वाहन खरेदीसाठी २ कोटी ६६ लाखाचा निधीस मंजुरी देण्यात आली आहे.
यात २५ बोलेरो आणि ८५ होंडा शाईन दुचाकी, १ मारुती कार व १ बोलेरो पिकअप व्हॅन आदी वाहनांचा यांचा समावेश आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार ११२ वाहने लवकरच पोलीस दलात दाखल होणार आहेत.
याबाबत जिल्हा पोलीस दलास नव्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या पोलीस दलाचे मनोबल उंचावणार असून अधिक सक्षम होण्यास मदत होईल तसेच CCTV कॅमेऱ्यासाठी ही १० कोटीं निधीची तरतूद करण्यात आली असून गृह विभागाकडून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर लागलीच डीपीडीसी मधून मंजुरी देणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.