जिल्हास्तरीय लोकशाही दिन 5 जुलै रोजी ऑनलाईन होणार

तहसील कार्यालयात उपस्थित राहून नागरीकांना दाखल करता येणार तक्रार
जिल्हास्तरीय लोकशाही दिन 5 जुलै रोजी ऑनलाईन होणार

जळगाव - Jalgaon

नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीयस्तरावर लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नागरीकांसाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन 5 जुलै, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferancing) होणार आहे. ज्या नागरीकांच्या काही तक्रारी असतील त्यांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात (Tehsil Offices) उपस्थित राहून तक्रारी मांडाव्यात. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijeet Raut) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com