जिल्हा बँक ; चोपड्यातून घनश्याम अग्रवाल यांचा दणदणीत विजय

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत
जिल्हा बँक ; चोपड्यातून घनश्याम अग्रवाल यांचा दणदणीत विजय

चोपडा -प्रतिनिधी jalgaon

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे चोपडा विकास सोसायटी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घनश्याम ओंकारलाल अग्रवाल यांचा एकूण ६४ मतदाना पैकी ६३ मतांनी दणदणीत विजय झाला. तर एक मत बाद झाले आहे. यावेळी घनशाम अग्रवाल यांचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोषात स्वागत केले.

याप्रसंगी चोसाकाचे चेअरमन अड.घनश्याम अग्रवाल,पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी,चोसाकाचे व्हॉईस चेअरमन शशिकांत देवरे,सुतगिरणीचे संचालक शशिकांत पाटील, राहुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र पाटील, बाजार समितीचे संचालक नंदकिशोर पाटील, भरत पाटील, अग्रवाल समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते संजय अग्रवाल, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाधक्ष नवमान काझी, वेले येथील माजी उपसरपंच विनोद पाटील, मामलदे येथील माजी सरपंच भरत इंगळे, घोडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य किशोर दुसाने, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रफुल्ल पाटील, पप्पू स्वामी, सागर पठार यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com