जिल्हा बँक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज : दहा जागांसाठी आज मतदान

जिल्ह्यातील 15 केंद्रांवर होणार मतदान; 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
जिल्हा बँक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज : दहा जागांसाठी आज मतदान
jdcc bank jalgaon

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या (District Co-operative Central Bank) संचालक पदाची निवडणुक (Election of Director) उद्या दि. 21 रोजी सकाळी 8 ते 4 पर्यंत पार पडणार आहे. निवडणुकीची संपुर्ण तयारी झाली आहे. तसेच 10 जागांसाठी जिल्ह्यात 15 मतदान केंद्र (Polling station) तयार करण्यात आले असून 31 उमेदवारांचे भवितव्य उद्या मतदान पेटीत बंद होणार आहे. तसेच मतदान केंद्रांसह स्ट्राँग रुमजवळ पोलिसांचा कडक बंदोबस्त (Strict police security) तैनात करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला होता. उमेदवारांनी अर्ज दाखल झाल्यापासून ते माघारी पर्यंत सुमारे 11 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडणुन आल्याने केवळ 10 जागांसाठी दि. दि. 21 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत मतदान होणार आहे. जिल्हाभरात मतदानासाठी 15 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा बँकेच्या दहा जागांसाठी जिल्हाभरातील सुमारे 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार असून 2 हजार 853 मतदारांच्या हाती या उमेदवारांची भवितव्य राहणार आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकत 17 जागांवरील भाजपच्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने यंदाची निवडणुक ही महाविकास आघाडीसाठी सोयीची बनली होती. मात्र तर देखील महाविकास आघाडीविरुद्ध महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या काही उमेदवारांनी शेतकरी विकास पॅनल म्हणून आव्हान दिले आहे. यातच शेतकरी पॅनलच्या काही उमेदवारांनी सहकार पॅनलच्या उमेदवारांना जाहीर पाठींबा दिला आहे. परंतु महिला राखीव, इतर संस्था मतदार संघ, ओबीसी मतदार संघासह काही सोसायटी मतदार संघात लढत होणार असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागून आहे.

मतदार केंद्रावर साहित्य रवाना

रविवारी जिल्हा बँकेच्या 10 जागांसाठी मतदान होणार असल्याने जिल्ह्यातील 15 केंद्र मतदानासाठी सज्ज करण्यात आले आहे. दुपारनंतर निवडणुक अधिकारी संतोष बिडवाई यांच्या उपस्थितीत जिल्हाभरातील मतदान केंद्रावर साहित्य रवाना करण्यात आले असून याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

तालुक्याच्या ठिकाणी करता येणार मतदान

निवडणुक विभागाकडून ज्या ज्या तालुक्यातील मतदारांच्या सोयीस्करासाठी तालुका निहार मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यामुळे तालुका स्तरावर मतदारांना मतदान करता येणार असल्याचे निवडणुक निर्णय अधिकार्‍यांनी सांगितले.

पोलिसांचा तडगा बंदोबस्त

जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी निवडणुक होणार असल्याने या निवडणुक कुठलाही अपप्रकार होवू नये, यासाठी सर्वच मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांत चुरस निर्माण झाल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे.

हे आहेत मतदान केंद्र

जळगाव - सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल, जिल्हापेठ, भुसावळ- म्युनिसीपल हायस्कुल, यावल -जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा, तहसील कार्यालयाशेजारी, रावेर - सौ. कमलाबाई एस. अगरवाल गर्ल्स हायस्कुल व मुलींचे कनिष्ठ महाविद्यालय, मुक्ताईनगर- जे. ई. स्कूल अ‍ॅन्ड ज्युनियर कॉलेज, बोदवड - जिल्हा परिषद मुलींचा शाळा नं. 1, जामनेर- न्यु इंग्लिश स्कूल, पाचोरा - श्री. गो.से. हायस्कुल, भडगाव - सौ. सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय व सौ जयनी गणेश पुर्णपात्री महाविद्यालय, चाळीसगाव - हिरूभाई हिमाभाई पटेल प्राथमिक विद्यालय व अन्नपुर्णाबाई पाटसकर बालक मंदीर, पारोळा - एन.ई.एस. माध्यमिक विद्यालय, अमळनेर - जी. एस. हायस्कुल, चोपडा - कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, धरणगाव - जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालय मराठी शाळा आणि एरंडोल - आर.टी. काबरे विद्यालय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com