जिल्हा बँकेत निवडणुक : भाजपकडून राष्ट्रवादीला जोरदार धक्का- माजी आमदार अरुण पाटील भाजप पुरुस्कृत उमेदवार

जिल्हा बँकेत निवडणुक : भाजपकडून राष्ट्रवादीला जोरदार धक्का- माजी आमदार अरुण पाटील भाजप पुरुस्कृत उमेदवार
USER

रावेर Raver|प्रतिनिधी-

रावेरमध्ये विकासो मतदार संघात (Vikaso constituency) राष्ट्रवादी कडून (Nationalist) इच्छुक असलेले माजी आमदार अरुण पाटील (Former MLA Arun Patil) भाजप पुरस्कृत उमेदवार (BJP sponsored candidate) म्हणून रिंगणात (In the arena) उतरले आहे,तर काँग्रेस कडूनही दोन जण रिंगणात उतरल्याने तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी (Turning to politics) मिळाली आहे.

माजी आमदार अरुण पाटील हे जिल्हा बँकेसाठी इच्छुक उमेदवार होते.मात्र रावेर च्या जागेवर काँग्रेसने दावा केल्याने त्यांची कोंडी होत असल्याने,त्यांच्याशी भाजप कडून संपर्क साधण्यात आल्यावर त्यांनी भाजप पुरुस्कृत होण्याचा निर्णय यावेळी घेतला,यानंतर माजी मंत्री गिरीष महाजन व जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांनी प्रबळ दावेदार असलेल्या नंदकिशोर महाजन यांना माघार घेण्यास सांगितले.

त्यानंतर राष्ट्रवादीला भाजपच्या या डावाने चांगलाच धक्का बसला आहे,काँग्रेसमध्ये देखील जनाबई महाजन यांची उमेदवारी निश्चित असताना,अचानक राजीव पाटील यांचा देखील अर्ज राहिल्याने काँग्रेसकडून दोन उमेदवार रिंगणात उतरले आहे.त्यामुळे आता पुढील काळात रिंगणात असलेले उमेदवार काय भूमिका घेतात,याकडे तालुक्यातील मतदारांचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com