जिल्ह्याचा १२ वीचा निकाल ९९.५४ टक्के

२०७ विद्यार्थी नापास
जिल्ह्याचा १२ वीचा निकाल ९९.५४ टक्के

जळगाव - Jalgaon

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १२वी चा निकाल दुपारी ४ वाजता जाहीर झाला. जळगाव जिल्ह्याचा ९९.५४ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातील ४५ हजार ३५७ विद्यार्थी प्रवेशित होते. त्यापैकी ४५ हजार १५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, २०७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये २५ हजार ८२६ मुल तर १९ हजार ३२४ मुलींचा समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर यंदा १२वी परीक्षा रद्द करण्यात आली होती. १२वीचे अंतर्गत मुल्यमापन तसेच १०वी आणि ११वीच्या गुणांच्या आधारे १२वीचा निकाल तयार करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com