सातपुड्यात 375 जणांना फराळासह नवीन कपडे वाटप

भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे डोंगरदे येथे राबविला उपक्रम
सातपुड्यात 375 जणांना फराळासह नवीन कपडे वाटप

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

येथील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे (Antarnad Pratishthan) यावल तालुक्यातील डोंगरदे (Mountains) येथे सामूहिक दिवाळी (Collective Diwali) साजरी (Celebration) करण्यात आली. त्यात 200 कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, स्वेटर, शैक्षणिक साहित्य, तांदूळ, पणत्या, बिस्किट, चॉकलेट आणि नविन चपला, बुट यांचे वाटप करण्यात आले.

दीपोत्सवानिमित्ताने अंतर्नादतर्फे ‘एक वाटी फराळ व नवीन कपडे द्या आणि वंचितांची दिवाळी गोड करू या’ असे आवाहन करण्यात आले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला.या उपक्रमांतर्गत गोळा करण्यात आलेले साहित्य व फराळ यावल तालुक्यातील डोंगरदे येथील आदिवासी पाड्यात वाटप करण्यात आला. उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे.

या उपक्रमासाठी रवींद्र निमाणी, निखिल देसाई, नितीन फेगडे, जयश्री शेलार, ललित पाटील, रघुनाथ सोनवणे, किशोर पाटील, हरीश फालक, डॉ.पंकज राणे, डॉ.नीलिमा नेहेते, मनोज फालक, विनोद अग्रवाल, किशोर हडपे, भूषण कोटेचा, निलेश वारके, वर्षा पाटील, कविता जगपती, शरद हिवरे, भरत बर्‍हाटे, सचिन पाचपांडे, लैलेश मास्टे, जय पाठक, जयकिशन टेकवाणी, ज्योती साठे, नगरसेवक किरण कोलते, परिक्षीत पवार, ज्ञानेश्वर मोरे, सागर मोहरील, सरला पाटील, भाग्यश्री भंगाळे, राजू गायकवाड, दिलीप सूर्यवंशी, नितीन वाणी, गिरीराज फेगडे, श्रीकांत मोटे, हेमंत बोरोकर, संजय मोताळकर, पंकज ढाके, भास्कर चिमणकर, विजय नेहते, मनमोहन करसाळे, विलास बेंद्रे, पवन कलापुरे, संदिप पाटील, युवराज पाटील, मुकेश बोरोले, विकास वारके, रवींद्र परदेशी, छाया पाटील, क्रांती सुरवाडे, मिलिंद सुरवाडे, दिपाली सोनार, आबिद शेख, किरण पाटील, पंकज चौधरी, ज्ञानेश्वर मेडिकल, ज्योती बेलसरे, राजेंद्र ढाके, अमोल जावळे, दिलीप चौधरी, संजय सुरवाडे, अलका देवगिरीकर, प्रकाश कासार, भारती अवचारे, धीरज बाणाईत, हितेश नेहेते, वरुण इंगळे, सुनिल पटेल, ललित फिरके, विनोद चोरडिया, अरुण फेगडे, प्रवीण पाटील, सुनिल कोंघे, किरण काकर, पल्लवी ढाके, दीपक चौधरी, मंगेश बाविस्कर, पप्पू वानखेडे, गिरीश महाजन, बी. एन. पाटील, शहजाद पटेल, राम काळे, विलास बेदारे, जयश्री काळवीट, प्रतिमा राणे, राजेंद्र सुरवाडे, महेंद्र भंगाळे, के.टी. तळेले, महेंद्र किनगे, पी. एस. नेमाडे, धिरज चौधरी या दात्यांचे सहकार्य लाभले.

प्रकल्प प्रमुख योगेश इंगळे, समन्वयक प्रदीप सोनवणे तर सह समन्वयक समाधान जाधव, अमित चौधरी होते. श्रीकांत जोशी, ज्ञानेश्वर घुले, जीवन महाजन, मेहरबान तडवी, संजय भटकर, देव सरकटे, प्रसन्ना बोरोले, आरीफ तडवी, गणेश जावळे, जीवन महाजन, प्रा.श्याम दुसाने, निवृत्ती पाटील, भूषण झोपे, अमितकुमार पाटील, कुंदन वायकोळे, राजू वारके, हरीश भट, हेमंत बोरोले, राजेंद्र जावळे, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, संदिप रायभोळे, शैलेंद्र महाजन, रोहिदास सोनवणे, शशिकांत राणे, रमेश गाजरे, हेमंत बोरोले, दीपक जावळे, प्रमोद पाटील, जयंत चौधरी, अमित नागराणी, मिलिंद राणे, सुशील पाटील, दीपक सोनवणे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य-

अंतर्नादतर्फे गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. पाड्यावरील चिमुकल्यांना नवे कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले होते. वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केल्याचा आनंद हा शब्दातीत आहे, अशी भावना अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली.

उपक्रमाला मिळाले व्यापक स्वरुप -

‘वाटीभर फराळ आणि कपडे द्या’ या उपक्रमाला यंदा दात्यांकडून जोरदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे त्यास व्यापक स्वरुप मिळाले आहे. भविष्यात हा उपक्रम लोकचळवळ व्हावा, या अनुषंगाने प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रकल्पप्रमुख योगेश इंगळे, समन्वयक प्रदीप सोनवणे, सह समन्वक समाधान जाधव, अमित चौधरी यांनी दिली. शहरी लोक पाड्यावर एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात याचा आनंद असल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com