गणेश विसर्जनासाठी डयुटीवर असलेल्या पोलीसांना फुड पॅकेट वितरण

जळगाव पीपल्स बॅंकेचा उपक्रम
गणेश विसर्जनासाठी डयुटीवर असलेल्या पोलीसांना फुड पॅकेट वितरण

जळगाव (Jalgoan)

प्रत्येक नागरीकांस लाभणारी सुरक्षितता व निश्चिंतता यामागे पोलीस कार्य करीत असतात. त्यामुळे आपण सर्व नागरीक प्रत्येक सण व उत्सव शांततेने व उत्साहाने साजरा करीत असतो. या विचाराने प्रेरीत होऊन सामाजिक उत्तरदायित्व आणि पोलीसांप्रती असलेला आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने दि जळगाव पीपल्स को-ऑप बँक गणेश विसर्जनादिवशी डयुटीवर असलेल्या पोलीसांना जेवणाचे वाटप करीत असते.

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूकीस बंदी आहे असली तरी दि. 19 सप्टेंबर 2021 रोजी गणपती विसर्जनासाठी ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना जळगाव पीपल्स बँकेच्या वतीने त्यांच्या ड्युटीच्या जागेवर जाऊन सकाळी व संध्याकाळी उत्कृष्ट दर्जाचे जेवणाचे पॅकेटस्‌ देण्यात आले. या उपक्रमांतर्गत एकुण 1200 फुड पॅकेटस्‌चे (food packets) वाटप पोलीस कर्मचारी, होमगार्ड इ. यांना बँकेकडून करण्यात आले.

शहर पोलीस स्टेशन, जळगाव, येथे मा.पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे (IPS) तसेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत (IAS), कुमार चिंथा (IPS) अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रकांत गवळी (Add. SP), विजयकुमार ठाकुरवाड (P.I., शहर पोलीस स्टेशन), यांच्या हस्ते पोलीसांना प्रातिनिधीक स्वरुपात फुड पॅकेट (food packet) देउन वाटपास सुरुवात करण्यात आली.

सदर प्रसंगी बॅंकेचे संचालक व माजी चेअरमन भालचंद्र पाटील, संचालक डॉ. सी. बी. चौधरी, ज्ञानेश्वर मोराणकर, बॅंकेचे एमडी व सीइओ श्री दिलीप देशमुख उपस्थित होते. बॅंकेतर्फे राबविल्या जाणा-या या उपक्रमा बददल पोलीस अधिक्षक मा श्री प्रविणजी मुंडे यांनी बॅंकेचे संचालक व माजी चेअरमन श्री भालचंद्र पाटील यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

पोलीस अधिक्षक, शहर पोलीस स्टेशन, यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे कर्मचारी रविंद्र कोष्टी, राजेंद्र जोशी, .गोविंद खांदे, विशाल कोल्हे, शुभम देशमुख, गोविंदा माळी, दिलीप महाजन, दिपक साळी, अतुल भंगाळे, योगेश काळे, रामकृष्ण पाटील, सचिन चौधरी इ. यांनी वाटपाचे काम केले. बंदोबस्ताचे पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली जेवण वाटपासाठी पोलीस अधिकारी यांची टीम याकामासाठी कार्यरत होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com