पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत धनादेशाचे वाटप

पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत धनादेशाचे वाटप

जळगाव - Jalgaon

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत जळगाव तालुक्यातील 20 महिलांना प्रत्येकी 20 हजार याप्रमाणे 4 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे (Guardian Minister Gulabrao Patil) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. त्यानुसार आज तालुक्यातील 20 महिलांना प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे एकूण 4 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या अर्थसहाय्यतून मुलांच्या शैक्षणिक व आवश्यक बाबींवर खर्च करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी उपस्थित महिलांना केले.

या लाभार्थ्यांना मिळाला लाभ

दापोरा : येथील श्रीमती जया ठाकरे, अनुसया तांदळे देवकाबाई पाटील, भागवत सोनवणे, सुमनबाई तांदळे.

जळके : येथील श्रीमती सीमा जाधव, शिरसोली येथील श्रीमती वंदनाबाई भोई, कानळदा येथील विष्णू बाविस्कर, श्रीमती सिंधू नन्नवरे, उषाबाई सपकाळे, इंद्रायणी सोनवणे, नलिनी गायकवाड

नशिराबाद : येथील श्रीमती अख्तरजहाँ मन्यार

धानवड : येथील श्रीमती पिंकीबाई राठोड

फुपनी : येथील श्रीमती कमलाबाई सैंदाणे

विदगाव : येथील आशाबाई कोळी

तरसोद : येथील सुनंदाबाई थोरात

धामणगाव : येथील अन्नपूर्णा बाविस्कर, सुलभा सपकाळे यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेनेचे शिवराज पाटील, जि.प.सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा पाटील (कोळी), फुपनी मा.सरपंच डॉ.कमलाकर पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे जळगाव ग्रामीणचे तालुका अध्यक्ष रमेशआप्पा पाटील, तहसीलदार नामदेव पाटील, गजानन मालपुरे, पंकज पाटील, प्रविण पाटील, उमाजी पानगळे व सचिन चौधरी,तहसीलचे अव्वल कारकून अर्चना पवार, ज्योती चौधरी यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com