राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना धनादेश वाटप

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना धनादेश वाटप

व्हेंटिलेटरचेही वितरण

जळगाव - Jalgaon

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत जळगाव शहरातील १४ कुटुंबांना प्रत्येकी २० हजार याप्रमाणे ३ लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश तसेच (Israel Chemical Limited Company) इझ्राईल केमिकल लिमिटेड कंपनीतर्फे सामान्य रुग्णालय करीता १० लाख किंमतीचे अत्याधुनिक व्हेंटिलेटर जिल्ह्याचे (Guardian Minister Gulabrao Patil) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते.

त्यानुसार आज शहरातील १४ कुटुंबांना प्रत्येकी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण ३ लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या अर्थसहाय्यतून मुलांच्या शैक्षणिक व आवश्यक बाबींवर खर्च करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी उपस्थितांना केले.

असे आहेत पात्र लाभार्थी

कविता खिलाडेकर, भारती मिस्तरी, हिराबाई खजूरे, हमीदा बी भिस्ती, राजेंद्र जाधव, कल्पना निकम, रत्नाबाई सपकाळे, सुषमा पाटील, संगीता कोळी, वंदना सोनवणे, शशिकला कोल्हे, सुरेश साळुंके, फातेमा बी रउफ व सोनाली कासार या पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजाराचा धनादेश मंजूर करण्यात आले असून यातील 8 कुटुंबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तर उर्वरीत लाभार्थ्यांना घरपोहच धनादेश वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

इस्राईल केमिकल्स लिमिटेड कंपनी मार्फत व्हेंटिलेटरचे वितरण

आपत्कालीन परिस्थितीत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी इस्राईल केमिकल्स लिमिटेड या कंपनीतर्फे अत्याधुनिक व्हेंटिलेटर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या स्पॅरो व्हेंटिलेटरची वितरण जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, विनोद तराळ, विभागीय व्यवस्थापक पंडित निरपणे, राजीव जाजू, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

तर धनादेश वाटप प्रसंगी आमदार राजुमामा भोळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, महानगर प्रमुख शरदआबा तायडे, समितीचे अध्यक्ष बाळा कंखरे, तहसीलदार ज्योती देवरे, शोभा चौधरी, नगरसेवक नितीन लढा, नितीन बरडे, बंटी जोशी, मनोज चौधरी, गणेश सोनवणे, जब्बार पटेल, सचिन पवार यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले तर आभार संजय गांधी निराधार योजना समितीचे शहराचे अध्यक्ष जयप्रकाश उर्फ बाळा कंखरे यांनी मानले.

Related Stories

No stories found.