
जळगाव jalgaon
शहरातील जोशीपेठेत (Joshi peth) व्यावसायिकांनी (professionals) दुकानांसमोर पक्के ओट्यांचे बांधकाम करुन अतिक्रमण (Encroachment) केले होते. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) अतिक्रमण निर्मुलन विभागाकडे (Department of Encroachment Elimination)प्राप्त झाली होती. या तक्रारीनुसार मंगळवारी महापालिकेच्या पथकाने कारवाई करत जेसीबीच्या माध्यमातून तब्बल १० अतिक्रमित ओटे तोडून टाकले. ही कारवाई करतांना पथकाने आणि दुकानदारांमध्ये वाद झाल्याने काही काळ तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
महानगरपालिका अतिक्रमण निर्मुलन विभागाचे पथक मंगळवारी सकाळी कारवाईसाठी जोशीपेठेत गेले होते. यावेळी पक्के अतिक्रमीत असलेले दहा ओटे जेसीबीच्या सहाय्याने तोडत असतांना दुकानदारांनी कारवाईला विरोध केला. त्यामुळे पथक आणि दुकानदारांमध्ये वाद झाला होता. दरम्यान ओट्यांवर तसेच रस्त्यावर दुकानदारांनी ठेवलेले साहित्य, महापालिकेच्या पथकाने जप्त केले. जवळपास तीन ट्रॅक्टर भरुन साहित्य जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई अतिक्रमण निर्मुलन अधीक्षक ईस्माईल शेख, लिपिक संजय ठाकूर, नाना कोळी, नितीन भालेराव, किशोर सोनवणे, अनिल कोळी, साहेबराव शंकपाळ, सलमान भिस्ती, सतीश मराठे यांच्यासह पथकाने केली.