जळगाव महापालिका महासभेत दांगडो

उपमहापौर कुलभूषण पाटील व नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात ‘तोडपाणी’ वरून वाद
जळगाव महापालिका महासभेत दांगडो
जळगाव शहर महानगरपालिकाJalgaon Municipal Corporation

जळगाव - प्रतिनिधी jalgaon

दीड वर्षांच्या कालावधीनंतर आज दि.१५ डिसेंबर रोजी (Jalgaon Municipal Corporation) जळगाव महानगरपालीकेची महासभा पुर्वीप्रमाणे झाली. या सभेत उपमहापौर (Kulbhushan Patil) कुलभूषण पाटील व भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक (Kailas Sonavane) कैलास सोनवणे यांच्या ‘तोडपाणी’ विषयावरून चांगलाच राडा झाला. या दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत चांगलाच वाद झाला.

प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच ऑफलाईन झालेल्या महासभेत व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीष कुळकर्णी व नगरसचिव सुनील गोरोणे उपस्थित होते.

सभेला सुरूवात झाल्यानंतर नगरसेवक कैलास सोनवणे यांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा व्यासपीठावर बसण्यावर हरकत घेतली. हा वाद एव्हढ्यावरच न थांबता एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत काही काळ सभेचे वातावरण तंग झाले होते.

शेवटी ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, विरोधीपक्ष नेते सुनील महाजन यांनी मध्यस्ती करत दोघांना शांत केले.

उपमहापौर व्यासपीठावर बसण्याची जुनी परंपरा-महापौर

उपमहापौरांच्या व्यासपीठावर बसण्याचा नियम सांगा अथवा कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका कैलास सोनवणे यांनी घेतली होती. तसेच यापूर्वी रमेश जैन उपमहापौर असताना असाच वाद झाल्यानतंर ते व्यासपीठावरून खाली उतरल्याची आठवण सोनवणे यांनी करून दिली. त्यावर महापौरांनी उपमहापौर व्यासपीठावर बसण्याची जुनी पंरपरा आहे, असे सांगत पुढील महाभसेत याबाबत अभ्यास करून निर्णय घेऊ, असे आश्वासन महापौर जयश्री महाजन यांनी दिले/

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com