पहूर बसस्थानकावर प्रवासी वाहतुकीचा वाद उफाळला : दोन गटात तुंबळ हाणामारी

पहूर बसस्थानकावर प्रवासी वाहतुकीचा वाद उफाळला : दोन गटात तुंबळ हाणामारी
पहूर बसस्थानकावर प्रवासी वाहतुकीचा वाद उफाळल्यानंतर घटनास्थळी पो.नि. अरुण धनवडे. (छायाचित्र- रवींद्र लाठे, पहुर)

पहूर, Pahur ता. जामनेर । वार्ताहर

पहूर बस स्थानक (bus stand) परिसरात गुरुवारी सकाळी अवैध प्रवासी वाहतुकीच्या (Illegal passenger transport) वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी (Fighting) ची घटना घडली.

पहूर येथे बस स्थानकालगत औरंगाबादकडे जाणार्‍या खाजगी ओमनीमध्ये बसलेले चार प्रवासी उतरून जळगावहुन औरंगाबादकडे जाणार्‍या खाजगी लक्झरी गाडीत बसले या कारणावरून दोन गटात शाब्दिक चकमक सुरू होऊन शाब्दिक चकमक चकमकीचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले.

या घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पोलीस उपनिरीक्षक बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक चेडे, व त्यांचे सहकारी भरत लिंगायत, ईश्वर देशमुख, ज्ञानेश्वर ढाकरे, श्री. सानप, अनिल राठोड, हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले पी.आय.अरुण धनवडे यांनी तिसरा डोळा उघडताच जमावावर काडी भिरकावून जमावाला थांबविले. पहुर बस स्थानक परिसरात अतिक्रमित अवैध प्रवासी वाहतूक गाड्या हटविण्यात आल्या.

दरम्यान दोन गटात झालेल्या या तुंबळ हाणामारी प्रकरणी पहूर पोलिस स्टेशनला तौसिफ शब्बीर शेख (वय 20, रा.अजिंठा जिल्हा औरंगाबाद), अल्ताफ रऊफ शेख वय 26, कलीम रऊफ शेख वय 28, अकबर रऊफ शेख वय 24, फजल शईद शेख वय 22,गोलु ऊर्फ रऊफ शेख वय 18 सर्व रा.हनुमान मंदिराजवळ पहूर पेठ ता.जामनेर, गणेश गुलाब बैरागी वय 22 रा. कासमपुरा जळगाव, चेतन सुधाकर पाटील वय 19, सचिन सुधाकर पाटील वय 22, आणि किशोर समाधान पाटील वय 25 सर्व रा. हनुमान मंदिराजवळ पहूर पेठ यांच्याविरुद्ध पोलीस ज्ञानेश्वर ढाकरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून भाग 5 गुरन 13/2022 भा दं वी कलम 353 ,332,504,506,143,147,149,188,269,270, मु.पो.का.क 37(1)(3)चे उल्लंघन 135 आपत्ती व्यवस्थापन का.2005 मधील कलम 51 सह मोवाका कलम 66/192 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

सात संशयितांना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भरत काकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरूण धनवडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com