जळगावात दोन गटात वाद, पोलिसांवर दगडांचा मारा

 जळगावात दोन गटात वाद, पोलिसांवर दगडांचा मारा

जळगाव jalgaon

शहरातील आझाद नगर (Azad Nagar) परिसरात मुलीची छेड (Piercing)काढण्याच्या कारणावरून शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास दोन गटात हाणामारी (Fighting in two groups) होवून दगडफेक (Stone throwing) झाली. यात एक जण जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरही दगडांचा मारा(Stone the police too) करण्यात आला.

शहरातील आझाद नगर भागात शनिवारी बाजार भरला होता. या बाजारात आलेल्या मुलीची छेड एकाने छेड काढली. त्याचा जाब विचारण्याच्या कारणावरुन वाद होवुन दोन गट आपसात भिडले. व काही वेळातच दगडफेक करण्यात आली.

घटनास्थळी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा हे पथकासह पोहचले असता त्यांच्यावर देखील दगडफेक करण्यात आली. या वादात एका गटाने केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची देखील तोडफोड झाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे,अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी घटनास्थळी दाखल झाले. क्यूआरटी पथकालाही पाचारण करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यासह संशयितांना ताब्यात घेण्याचे काम सुरू होते.

दगडफेकीत एक जण जखमी झाला असुन त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com