अमळनेर काँग्रेसच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष-पदाधिकार्‍यांमध्ये वाद

अमळनेर काँग्रेसच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष-पदाधिकार्‍यांमध्ये वाद

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे (District Congress Committee) अमळनेर (Amalner) येथे गुरूवारी घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष (presidents) आणि तालुका पदाधिकार्‍यांमध्ये (office bearers) जोरदार वादंग (Dispute) झाले. जिल्हाध्यक्षांनी तालुका सरचिटणीसाचे चक्क शिक्षणच काढले. दरम्यान जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार (District President Pradeep Pawar) हे पक्षात मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप तालुका सरचिटणीस संतोष पाटील (General Secretary Santosh Patil) यांनी केला आहे.

जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे (District Congress Committee) सदस्य नोंदणी अभियान (Member Registration Campaign) सध्या सुरू आहे. त्यासाठी तालुकानिहाय बैठका देखिल घेतल्या जात आहे. गुरूवारी दुपारी अमळनेर येथे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार (District President Pradeep Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली तालुका पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत काँग्रेसचे तालुका सरचिटणीस संतोष पाटील (General Secretary Santosh Patil) यांनी जिल्हाध्यक्ष पवार यांना काँग्रेस भवनाच्या जागेच्या विक्रीसंबंधी आणि पक्षातील इतर कार्यक्रमांसंबंधी प्रश्न उपस्थित केले. हे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी संतोष पाटील यांना चक्क तुमचे शिक्षण काय? असा सवाल केल्याचे संतोष पाटील यांनी सांगितले. यावरून बैठकीत जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांमध्ये चांगलाच वाद (Dispute) झाला. तसेच बैठकीत संतोष पाटील यांना निलंबीत करण्यात आल्याचा ठराव करण्यात आल्याचे समजते. यावेळी काँग्रेसचे हर्षल पाटील, निळकंठ पाटील, विजय पाटील, उमेश पाटील, व्ही.व्ही. शेटे उपस्थित होते.

दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार हे पक्षात मनमानी कारभार (Arbitrary management) करतात. ते कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांवर ओरडतात. कार्यकर्त्यांचा अपमान करतात असा आरोप तालुका सरचिटणीस संतोष पाटील यांनी केला आहे. अमळनेर काँग्रेसच्या बैठकीत झालेल्या या वादाची चर्चा जिल्हाभरात रंगली होती.

अमळनेरच्या बैठकीत वाद झाला नाही. संतोष पाटील यांचा पक्षाशी संबंध नाही. त्यांचे आपआपसात काही तरी सुरू होते. इतर पदाधिकार्‍यांनीच त्यांना बैठकीतुन जाण्यास सांगितले. माझ्यावरील आरोपात तथ्य नाही.

प्रदीप पवार, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com