महापालिकेतील प्रलंबित कामांचा तत्काळ निपटरा करा

मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या आढावा बैठकीत सूचना
महापालिकेतील प्रलंबित  कामांचा तत्काळ निपटरा करा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आपले सरकार पोर्टलवर (Your Government Portal) व इतर सेवा पोर्टल, वेबसाईट (website) याचा आढावा घेतला असता अनेक प्रकरणी विविध विभागांकडे (various departments) नागरिकांचे (citizens) अर्ज प्रलंबित (Application pending) असून ते विहित कालमर्यादेमध्ये त्याचा निपटारा (Settlement) झाले नसल्याचेे निदर्शनास आले आहे. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात (National leader to father of the nation) प्रकरणांचा निपटारा करा, अशा सूचना मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Municipal Commissioner Dr. Vidya Gaikwad) यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता आयुक्त यांचे कार्यालयीन सभागृहात झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत दिल्या.

राज्य शासनातर्फे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान कालावधीत राबवला जात आहे. यासंदर्भात आयोजित बैठकीत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड ह्या बोलत होत्या. सर्वसामान्य जनतेची कामे नेमून दिलेल्या कालावधीत पूर्ण व्हावीत याकरिता राज्य शासनाने आपले सरकार सेवा पोर्टल व नागरी सेवा केंद्र, विभागांचे स्वतःचे पोर्टल व वेब पोर्टल सुरू केलेले आहे.

त्या माध्यमातून जनतेची कामे विविध कामे मर्यादेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सर्व प्रलंबित, संदर्भ, अर्ज, तक्रारींचा निपटारा सदर सेवा पंधरवाडा कालावधीमध्ये मोहीम स्वरूपात करणे अपेक्षित आहे. त्याकरिता यापूर्वीच उपायुक्त प्रशांत पाटील यांनी आपल्याला कार्यालयीन आदेश यापूर्वीच निर्गमित केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

तसेच यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करण्यात येऊ नये, अशा कडक सूचना आयुक्त डॉ. गायकवाड यांनी या बैठकीत सर्व अधिकारी व विभाग प्रमुखांना दिल्या.

या बैठकीस मुख्य लेखा अधिकारी तथा उपायुक्त चंद्रकांत वानखेडे, मुख्य लेखापाल तथा उपायुक्त महसूल प्रशांत पाटील, शहर अभियंता एम.जी.गिरगावकर, सहा. संचालक के.पी.बागुल, सहा.आयुक्त आरोग्य अभिजीत बाविस्कर, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, पा.पु. उपअभियंता संजय नेमाडे, विद्युत उप.अभियंता एस.एस. पाटील, नगरसचिव तथा सहा.आयुक्त सुनील गोराणे, प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 चे प्रभाग अधिकारी व इतर विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com