तापी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयावर जप्तीची नामुष्की

भूसंपादित जमिनीचा वाढीव मोबदला शेतकर्‍यांना देण्यास टाळाटाळ
तापी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयावर जप्तीची नामुष्की

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

तालुक्यातील शिरसोली (Shirsoli) येथील शेतकर्‍यांचा (farmers) संपादित जमिनीचा (acquired land) वाढीव मोबदला (Increased remuneration) न दिल्याने तापी पाटबंधारे विभागाच्या (Tapi Irrigation Department) कार्यालयावर न्यायालयाच्या आदेशाने (court order) गुरुवारी जप्तीची कारवाई (Confiscation action) करण्यात आली. यात तापी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांची खुर्ची सह संगणकासह इतर वस्तू जप्त करण्यात आले आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली शिवारात असलेल्या नायगाव प्रकल्पासाठी शिरसोली येथील निजामुद्दीन समशोद्दीन पिंजारी, रवींद्र नथ्थु पाटील, देविदास बारी, रामा नेटके, समीना बाई शेख व इतर एक अशा एकूण सहा शेतकर्‍यांची जमीन संपादित 2001 साली संपादीत करण्यात आली आहे. वाढीव मोबदल्यासाठी शेतकर्‍यांनी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आहे. त्यावर 2020 न्यायालयाने शेतकर्‍यांच्या बाजूने निकाल देऊन तापी पाटबंधारे महामंडळाला शेतकर्‍यांना वाढीव नुकसानभरपाई देण्याचे आदेशित केले आहे. मात्र तापी पाटबंधारे विभागाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने गुरूवारी अ‍ॅड. संजय पाटील यांनी न्यायालयाच्या आदेशाने जप्तीची कारवाई केली. यावेळी शिरसोलीतील शेतकरीही उपस्थित होते.

कार्यकारी संचालकांवर अटकेची टांगती तलवार

कार्यकारी संचालकांची खुर्ची संगणक कीबोर्ड माऊस असे साहित्य यावेळी जप्त करण्यात आले. दरम्यान या प्रकरणात तापी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांना अटक का करण्यात येऊ नये अशी ही नोटीस बजावण्यात आली असून त्यावर 30 नोव्हेंबर रोजी कामकाज होणार असल्याची माहिती अ‍ॅड. संजय पाटील यांनी बोलताना दिली. त्यामुळे कार्यकारी संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com