माहेश्वरी समाज बैठकीत ऑनलाईन परिचय संमेलनावर चर्चा

माहेश्वरी समाज बैठकीत ऑनलाईन परिचय संमेलनावर चर्चा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

माहेश्वरी विवाह सहयोग समितीच्या (Maheshwari Marriage Cooperation Committee) कार्यकारिणीची (Executive) बैठक शनिवारी समितीच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत (Meeting) समितीतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिचय संमेलनाबाबत (Online introductory meeting) चर्चा करण्यात आली. त्यानंतर विवाह सहयोग समितीच्या नवीन कार्यकारणीची देखील यावेळी निवड करण्यात आली.

माहेश्वरी विवाह सहयोग समितीच्या कार्यकारिणीची बैठकीला सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. समितीचे सचिव सुरजमल सोमाणी यांनी मागील मिटींगचे इतिवृत्तांत सभेत दिले. समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर झंवर यांनी मनोगत व्यक्त केले. समितीतर्फे ऑनलाईन परिचय संमेलन घेण्यात आले होते त्याबद्दल सभेत चर्चा करण्यात आली. आज पर्यंतचे हिशोब सहकोषाध्यक्ष विवेकानंद सोनी यांनी सभेत मांडले.माहेश्वरी विवाह सहयोग समिती तर्फे आज पर्यंत 27 परिचय सम्मेलन आयोजित करण्यात आले आहेत. तसेच 7 सामूहिक विवाह समारोह आयोजित करण्यात आली आहेत.

अध्यक्ष शामसुंदर झवर यांनी त्यांचा वृद्धापकाळ आणि तब्येतीच्या कारणांस्तव समिती समोर राजीनामा दिला व राजीनामा स्वीकार करण्याची विनंती केली. त्यांनी आजपर्यंत दिलेली सेवा पाहून तसेच त्यांचे वृद्धापकाळ आणि तब्येतीमुळे समितीने राजीनामा मंजूर करण्यात आला.

समीतीचे नवीन अध्यक्ष म्हणून मनीष झंवर यांचे नाव सर्वानुमते घोषित करण्यात आले. त्यानंतर सचिवपदी डॉ.जगदीश लढ्ढा, कोषाध्यक्ष विवेकानंद सोनी, सहकोषाध्यक्ष वासुदेव बेहेडे, उपाध्यक्ष प्रमोद झवर, कैलास लाठी, सहसचिव तेजस देपुरा, सलाहगार श्यामसुंदर झवर, सूरजमल सोमाणी, सुभाष जाखेटे यांची एकमताने निवड करण्यात आली.कार्यकारिणी सदस्यांच्या वतीने सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे कौतुक करण्यात आले. बैठकीला नारायण सोमाणी, दिपक लढ्ढा, जगदीश जाखेटे, एड.राहुल झवर, गिरीश झवर व इतर सदस्य उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com