एनसीसी कॅम्पमध्ये आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

नाहाटा महाविद्यालयात आयोजन : मान्यवरांकडून मार्गदर्शन
एनसीसी कॅम्पमध्ये आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी (18 Maharashtra Battalion NCC) जळगावतर्फे आयोजित अ‍ॅन्युअल ट्रेनिंग कॅम्प (Annual Training Camp) येथील नाहाटा महाविद्यालयात (Nahata College) दि. 15 ते 25 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केलेला होता. यात शेवटच्या दिवशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (Disaster management) जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे एक दिवशीय कार्यशाळा (Workshop) आयोजित करण्यात आली होती.

सदर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये शस्त्र प्रशिक्षण, ड्रील ट्रेनिंग, सामाजिक सेवा, लष्करी प्रशिक्षण इ. समाविष्ट होते. शिबिराचे उद्घाटन 15 रोजी कर्नल प्रवीण धीमन यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एनसीसी विषयी विद्यार्थ्यांची काय भूमिका आहे याबद्दल सांगितले.

शिबिरामध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतल्यानंतर समारोपप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. या कार्यशाळेसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निर्देशानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ यांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना भूकंप, पूर विमोचन, अग्निशामन, अपघात याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. याचबरोबर विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती दरम्यान काय करावे काय करू नये याबाबत व आपण काय भूमिका घ्यायची याबद्दल मार्गदर्शन अर्जुना संस्थेच्या प्रशिक्षित पथकाद्वारे करण्यात आले.

एन.सी. सीच्या माजी सैनिकांद्वारे संचालित अर्जुना संस्थेच्या 25 वर्षाच्या देशकार्याबद्दल कर्नल प्रविण धीमन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी 18 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रवीण धीमन, प्राचार्य. डॉ. मीनाक्षी वायकोळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंग रावळ, उपप्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील, डॉ. बी. एच. बर्‍हाटे, डॉ. ए. डी. गोस्वामी, डॉ. एन ई भंगाळे तसेच अर्जूना संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर पंड्या, संस्थापक सदस्य नारायण घोडके, किशोर सावदेकर, प्रदीप पाटील, प्रशिक्षक सतीश कांबळे, रवींद्र पाटील, आकाश चौधरी, योगिनी चौधरी, अनिल भिगाणे, फरीद बागवान, चेतन बोरनारे, अक्षय राजनकर, स्कायलेब डिसोझा, रोहित श्रीवास्तव, करण रावळ त्यांची टीम उपस्थित होती. यशस्वितेसाठी कॅप्टन स्मिता, लेफ्टनंट डी. एन. पाटील, सुभेदार जयपाल यांच्यासह संपूर्ण जळगाव बटालियन आणि महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com