एकनाथ खडसेंना देण्यात आलेले अपंग प्रमाणपत्र...

वैद्यकीय तपासणीअंतीच दिले प्रमाणपत्र ः दिव्यांग मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. मारोती पोटे यांची माहिती
एकनाथ खडसेंना देण्यात आलेले अपंग प्रमाणपत्र...

जळगाव । jalgaon प्रतिनिधी

माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) हे त्यांच्या अपंगाबाबतच्या (handcapped) मिळालेल्या प्रमाणपत्रामुळे चर्चेत आले असून ते प्रमाणपत्राबाबत चौकशी करुन ते रद्द करण्याची मागणी होत आहे. मात्र शासनाच्या (government) नवीन निर्णयानुसार समाविष्ट करण्यात आलेल्या जुन्या आजारांनुसार वैद्यकीय तपासणी करुनच 60 टक्के दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अपंग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे (President of the Disability Board, Dr. Maroti Pote) यांनी दै. देशदूतशी बोलतांना दिली आहे.

दोन ते तीन दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी एकनाथ खडसेंना देण्यात आलेल्या अपंगाबाबतच्या प्रमाणपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच त्याबाबत मालपुरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजसह माहिती अधिकारात माहिती मागविली होती. तर दुसरीकडे अपंग बांधवांनी खडसेंना देण्यात आलेले अपंगाबाबतचे प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली होती.

अपंग प्रमाणपत्राबाबत उपस्थित झालेल्या प्रश्न तसेच आरोपांना अनुसरुन शनिवारी दै. देशदूतने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दिव्यांग मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. मारोती पोटे यांच्याशी संपर्क साधला. त्यात डॉ. मारोती पोटे म्हणाले की, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नोंदणी करुन तारीख घेतली. त्यानुसार ते तपासणीसाठी आले असता, त्यांची तपासणी करण्यात आली. व त्यांना 60 टक्के अपंगाबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले. 24 सप्टेंबर 2018 शासन निर्णयानुसार 21 प्रकाराचे जुने आजार अपंगाच्या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसारच तपासणी व शासन नियमानुसारच एकनाथ खडसेंना हे 60 टक्के अपंग असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. खडसेंना देण्यात आलेले प्रमाणपत्र हे तात्पुरते स्वरुपाचे असून त्याची मुदत 1 वर्षासाठीच असल्याचेही डॉ. मारोती पोटे यांनी बोलतांना सांगितले.

Related Stories

No stories found.