दूध संघाच्या संचालकांची उच्च न्यायालयात धाव

आमदार एकनाथराव खडसे यांची माहिती; सोमवारी सुनावणीची शक्यता
दूध संघाच्या संचालकांची उच्च न्यायालयात धाव

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ (Board of Directors of District Milk Union) बरखास्त (dismissed) करुन प्रशासक मंडळाची (Appointment of Board of Directors) नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, याबाबत शासनाचे अद्यापर्यंत आदेश प्राप्त झालेले नाही. दरम्यान, प्रशासक मंडळ निर्णयाच्या आदेशाविरोधात संचालक मंडळाने (Board of Directors against the order) मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court), औरंगाबाद खंडपीठात याचिका (Aurangabad Bench Petition filed) दाखल केली असून, यावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता असल्याची माहिती माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे (Former Minister MLA Eknathrao Khadse) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा दूध संघाबाबत बडतर्फ असलेले कर्मचारी एन.जी.पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरुन संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश काढले आहेत. तक्रारीवरुन अजूनपर्यंत चौकशी झाली नाही, दोषी आढळले नाही. त्यामुळे शासनाचे आदेश बेकायदेशिर असल्याचा आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला. दूध संघात गैरव्यवहार झाला असेलतर खुशाल चौकशी करा. चौकशीअंती गैरव्यवहार असेलतर कारवाई करा. असे आव्हानदेखील खडसे यांनी दिले.

सुडबुध्दीने केलेली कारवाई

जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्तीची सरकारने केलेली कारवाई ही केवळ सुडबुध्दीने केली आहे. राजकीय व्देशाने केलेली असल्याचा आरोपही आ.खडसे यांनी केला.

दूध संघाची प्रगती सहन होत नाही

दूध संघ आता, प्रगतीपथावर आहे. जवळपास 91 कोटींची भाग भांडवली गुंतवणूक केली आहे. दूध संघाची प्रगती काही लोकांना पहावत नाही. त्यामुळे राजकीय हेतूने प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आल्याचेही आ.खडसे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांकडे आ.गिरीश महाजन आणि एन.जी.पाटील यांनी तक्रार केली असल्याचेही ते म्हणाले. मात्र, या तक्रारीची शासनाने कुठलीही शहानिशा न करता, संचालक मंडळ बरखास्त करणे हे आश्चर्यकारक आणि अनाकलनीय असल्याचे आ.खडसे यांनी सांगितले.

भरतीप्रक्रियेची निवड यादी न्यायालयात

जिल्हा दूध संघात भरतीप्रक्रियेसाठी राज्य सरकारने परवानगी दिली होती. भरती प्रक्रियेसाठी एजन्सी नेमण्यात आली होती. परीक्षा ऑनलाईन झाली असून, ही प्रक्रिया पारदर्शक झाली आहे. निवड यादी न्यायालयाकडे आहे. अद्यापपर्यंत ऑर्डर दिलेल्या नाहीत. तर भ्रष्टाचार कसा होवू शकतो? असा सवालदेखील आ.खडसे यांनी उपस्थित केला. दरम्यान, दूध संघात ताक, दूध, लोणी याकडे काही जणांचे लक्ष असल्याचा टोला आ.खडसे यांनी विरोधकांना लगावला.

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ
जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ

चार प्रशासकांनी घेतला ताबा

जिल्हा दूध संघात संचालक मंडळ बरखास्त करुन 11 जणांचे प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश प्राप्त होताच शुक्रवारी रात्री चार प्रशासकांनी जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात जाऊन एम. डी. लिमये यांच्या उपस्थितीत ताबा घेतला आहे. यात अशोक कांडेलकर, अमोल पाटील, अमोल शिंदे यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com