दीपोत्सवामुळे बाजारपेठेत चैतन्य

दीपोत्सवामुळे बाजारपेठेत चैतन्य

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

उत्साह, आनंद आणि चैतन्याचा उत्सव व प्रकाश पर्व (Festival of Lights) सुरु झाला आहे. त्यामुळे खरेदीसाठी (Market) बाजारपेठ सज्ज झाली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होतांना दिसत असल्याने बाजारपेठेत खरेदीला वेग आला आहे. वसुबारस (Vasubaras) पासून दीपावलीची (beginning of Diwali) सुरुवात होत असून आता पासूनच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत दिवसभर सर्व दुकानांमध्ये मोठी लगबग (Almost) दिसून येत आहे.

यंदा कोरोनाच्या सावटाखाली गुढीपाडवा, अक्षयतृतीया सण गेले. मात्र दसर्‍यापासून कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने दीपावली उत्साहात साजरी होण्याचे संकेत असल्यामुळे बाजारपेठ सज्ज झाली आहे. दीपावलीसाठी आकाशकंदील विविध पणत्या, कपडे, पूजेचे साहित्य विविध गृहोपयोगी वस्तूंची बाजारपेठ सजली आहे. महिनाभरापासून शहरातील रविवारचा आठवडे बाजारपेठेत बाजारही मोठ्या प्रमाणात भरत आहे.

फराळाचे साहित्यांची खरेदी- दवाळ सणासाठी फराळ करण्याची पद्धत असल्यामुळे त्यामुळे या फराळासाठीचे साहित्य पोहे, शेंगदाणे, खोबरे, बेसन पीठ, मसाले, रवा, मैदा, साखर ,तेल इत्यादी साहित्य खरेदीसाठी किराणा दुकान सह सुपर शाँपवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे, या सोबतच फराळ तयार करून घेण्यासाठीही ठिक ठिकाणी आचारी मंडळींनी दुकाने थाटली आहे. तेथे खरेदीसाठी रात्रीदेखील ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.

वाहनांची बुकिंग जोरात- धनत्रयोदशीला विविध वस्तूंसह वाहने खरेदी ही मोठ्या प्रमाणात केली जाते त्यासाठी गेल्या दोन आठवड्यापासून दुचाकीची बुकिंगही सुरु आहे. यंदा सणाच्या खरेदीसाठी मोठा उत्साह असून आतापर्यंत विविध प्रकारच्या चारशेच्यावर दुचाकींची बुकिंग झाल्याची माहिती मिळाली. याचा मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्याची ही ग्राहकांचे नियोजन आहे.

कपडे खरेदी जोरात- ग्राहकांच्या पसंतीला उतरतील असे आकर्षक रंगसंगतीचे कपडे व्यावसायिकांनी विक्रीसाठी आणले आहे या कपड्यांना सर्वाधिक मागणी दिसून येत आहे. कुर्ता, चुडीदार जॅकेट्स, प्रिंटेड कुर्ता, फॉर्मल शर्ट, कॅज्युअल शर्ट, टी शर्ट, जीन्स तसेच लहान मुलांचे विविध प्रकारचे कपडे तसेच साड्या खरेदी करण्यासाठी दररोज ग्राहक दुकानांकडे वळत आहेत, अनेक ठिकाणी कपडे साड्यांवर आकर्षक सूट दिली जात आहे. याचा ग्राहकांना मोठा फायदा घेत आहेत तसेच चपलांवर व्यवसायिकांनी 20 ते 40 टक्क्यांपर्यंत सवलत दिली आहे.

आरक्षण फुल- दीपावली सणा निमित्त बाहेर गावी जाणारे व येणार्‍यांची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त उत्सव स्पेशल गाड्या सुरु करण्यात आल्या आहे. मात्र सद्या या गाड्यांचे आरक्षण ही फुल झाले आहे. त्यात शासनाने सध्या ट्रॅव्हल्सला परवाणगी दिली असल्यामुळे या गाड्यांमध्ये ही बुकींग सुरु आहे. शिवाय परिवहन मंडळानेही आपली सेवा पूर्ण क्षमतेने सुरळीत सुरु केल्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ मिळत असून मागील 7-8 महिन्यांपासून घरातच जखळून असलेल्या नागरिकांना प्रवासासाठी दिलासा मिळत आहे.

ऑनलाइन खरेदी- दीपावली निमित्त ऑनालाइन कंपन्यांनी आकर्षक सुट दिल्याने या खरेदीला ही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com