राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये डिनर डिप्लोमेसी
चोरवड ता.रावेर येथे राष्ट्रवादीचे माजी जिप सदस्य रमेश पाटील यांच्या निवासस्थानी सहभोजनाचा आनंद घेतांना माजी आ.अरुण पाटील

राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये डिनर डिप्लोमेसी

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत डमेज कंट्रोल रोखण्यासाठी माजी आ.अरुण पाटील भूमिका

रावेर|प्रतिनिधी raver

जिल्हा बँक निवडणुकीने निमित्ताने रावेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अनेक पडघम उमटले, राष्ट्रवादी पक्षात रावेरात नेहमी दोन गट राहिल्याने कट-शह सुरूच होते. दोन्ही बाजूने एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी एकही संधी सोडली जात नाही. आता मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये डिनर डिप्लोमेसी (Dinner Diplomacy) चांगलीच रंगली आहे.या निमित्ताने मनोनोमिलन झाल्याची चर्चा होत असतांना, हा गोडवा टिकून राहील का अशी विचारणा कार्यकर्ते करत आहे.

माजी आमदार अरुण पाटील हे सध्या भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आहे. त्यांनी आधीच राष्ट्रवादीमध्ये दुसऱ्या गटाचा त्रास झाल्याचे बोलले होते. त्यामुळे कदाचित त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार बनल्याचा निर्णय घेतला असेल. त्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार जनाबाई महाजन व राजीव पाटील या दोन्ही उमेदवारांनी त्यांना पाठींबा दिला असल्याने निवडणूक आता औपचारिक होईल, असे असतांना अरुण पाटील मात्र कोणताच धोका पत्करून न घेण्यासाठी,माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्या सोबत डिनर डिप्लोमेसी करतांना काल शुक्रवारी दिसून आले.

यावेळी आगामी बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आ.अरुण पाटील यांनी हस्तशेफ करू नये अशी देखील चर्चा झाल्याची माहिती आहे.यावेळी माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील,नितीन पाटील,अटवाडे सरपंच गणेश महाजन उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com