धरणगावी नववर्ष स्वागताला गालबोट : तरुणाची निर्घृण हत्या :

आपसी वैमनस्यातून घटना : १७ जण पोलिसांच्या ताब्यात. 
धरणगावी नववर्ष स्वागताला गालबोट : तरुणाची निर्घृण हत्या :

धरणगाव Dharanga (प्रतिनिधी) 

शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये ‘थर्टी फर्स्ट’च्या (New Year's welcome) रात्री किरकोळ वादातून एका ३० वर्षीय तरुणाचा (youth) निर्घृण खून (murder) झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. कालू सोनवणे (वय 30 रा. दहिवद तांडा, शिरपूर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये काही बाहेर जिल्ह्यासह राज्यातील मजूर काम करतात.दि.३१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास कालू सोनवणेचा जिनिंग मधील काही बिहार प्रदेशातील मजुरांसोबत किरकोळ विषयातून वाद झाला. थोड्याच वेळात वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. साधारण १५ ते १७ जणांनी हल्ला चढवल्यामुळे कालू हतबल झाला. तेवढ्यात एकाने कालूच्या डोक्यात लाकडी दांडा टाकला. यात तो जागीच कोसळला.

यानंतर सर्व संशयित आरोपी जिनिंग सोडून फरार झाले. कालूला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींच्या शोधार्थ वेगवेगळ्या भागात पथक रवाना केली. अनोरे, धानोरे,गारखेडा या भागातील जंगलांमध्ये रात्रभर पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेतला. एकेक करून पहाटेपर्यंत पोलिसांनी तब्बल १७ जणांना ताब्यात घेतल्याचे कळते.

  पोलीस निरीक्षक राहुल खताळ ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जिभाऊ पाटील, पीएसआय अमोल गुंजाळ, पोका विनोद संदानशिव, पोना मिलिंद सोनार,पोलीस हवालदार संजय सूर्यवंशी, समाधान भागवत, प्रमोद पाटील, मनोज पाटील, महेश देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे जितेंद्र पाटील, महेश पाटील या पथकाने रात्रभर जंगल भागात शोध घेऊन संशयित आरोपींना ताब्यात घेतले

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com