धरणगाव : श्री बालाजी रथोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मिरवणुकीला बंदी. मात्र, भाविंकांच्या भक्तीला उधाण
धरणगाव : श्री बालाजी रथोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

धरणगाव- प्रतिनिधी Dharangaon

सालाबादप्रमाणे ह्या वर्षी देखील येथील श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचा रथोत्सव शांततेत पार पडला. कोरोना महामारी मुळे सार्वजनिक रथोत्सवात मिरवणुकीवर बंदी होती. मात्र, भाविकांच्या भक्तीला उधाण आले होते. रथाचे जागेवरच पुजन करण्यात आले. रथाला दहा फुटा पर्यंत ओढुन लागलीच ठिकाणावर आणण्यात आले.

प्रमुख अतिथींचा हस्ते रथाची विधीव्रत पुजा करण्यात आली. या प्रसंगी जि प सदस्य प्रतापराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, तहसीलदार नितिन देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, एपीआय पवन देसले, मुख्याधिकारी जनार्दन पवार आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष प्रा डि आर पाटील , सदस्य डि जी पाटील,ज्ञानेश्वर महाजन, भानुदास विसावे यांनी प्रमुख अतिथींचा सत्कार केला. मंडळाचे पदाधिकारी प्रशांत वाणी यांनी प्रमुख पाहुण्याचा परीचय, सुत्रसंचालन करून आभार व्यक्त केले. प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, मंदीर बांधकाम समितीचे जिवनआप्पा बयस, सचिव राजेद्र पवार, सह सचिव किरण वाणी, सह असंख्य सभासद उपस्थित होते. रथाची जागेवर पुजा केली असताना सोशल डिस्टंन्सिंगचे जाणीव ठेवण्यात आली. कायदेशीर नियमाचे पालन करून कोणतेही वाद्य न वाजता मोजक्या सभासदांचा उपस्थित मंत्र पठन व पुजन गणेश पुराणिक यांनी यथासांग शास्त्रोक्त पध्दतीने केले.

रथाच्या मिरवणुकीला कोरोनामुळे स्थगीती असल्याने कसा प्रतिसाद मिळतो याबाबत उत्सुकता होती. नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून आयोजकांच्या मेहनतीचे चीज केले. रात्री ९ वाजेपर्यंत मंदिराच्या प्रांगणात नागरीकांची रीघ लागली होती. एकादशीला गावातील सर्व रस्ते जणू श्री बालाजी मंदिराकडेच वहात होते. मंडळातील सर्व जाणकार सदस्यांनी पथ्य पाळत जनतेला आनंद घेवू दिला. या बद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com