धरणगाव न.पा.च्या २० कोटी अपहराचा खटला औरंगाबाद खंडपीठात दाखल

धरणगाव न.पा.च्या २० कोटी अपहराचा खटला औरंगाबाद खंडपीठात दाखल

धरणगाव Dharangaon (प्रतिनिधी)

येथील नगरपालिकेत (municipality) २० कोटींचा अपहार (20 crore embezzlement) झाला आहे असा आक्षेप घेत धरणगाव जागृत जनमंचचे (awakened masses) जितेंद्र महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad bench) याचिका दाखल (Petition filed) केली आहे. या संदर्भात ॲड.भूषण महाजन हे कामकाज बघत आहेत.

ध.न.पालिकेच्या २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षाच्या लेखा परीक्षण अहवालात जवळपास २० कोटींच्या रकमेची अनियमितता दर्शक ४७९ प्रकारच्या नोंदी नमूद केल्या आहेत. हाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, नगरविकास विभागाचे सचिव, धरणगाव पोलीस स्टेशन, पोलिस अधिक्षक जळगाव यांच्याकडे गुन्हा दाखल करणेसाठी तक्रार केली होती.

मात्र सर्व ठिकाणी योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने अखेर महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे फौजदारी रिट याचिका क्र.८६७/२०२२ दाखल केली असून गुन्हा नोंदविण्या संदर्भात आदेश करण्याची विनंती केली आहे. याचिकेची सुनावणी ३० जून २०२२ रोजी ठेवण्यात आली आहे.

तत्कालीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व कंत्राटदार यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून पोलीस यंत्रणेकडून निरपेक्ष तपास व्हावा अशी मागणी महाजन यांनी केली आहे. कोरोनामुळे वर्ष २०१९-२०, २०२०-२१ चे लेखा परिक्षण अद्याप झाले नसल्याने तेथे देखील कोट्यवधींची अफरातफरीची शक्यता याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com