धरणगाव - एरंडोल कृउबास निवडणूक १८ जागांसाठी एकूण ३९ उमेदवार रिंगणात

धरणगाव - एरंडोल कृउबास निवडणूक १८ जागांसाठी एकूण ३९ उमेदवार रिंगणात

धरणगाव Dharangaon - प्रतिनिधी

येथील धरणगाव - एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Dharangaon - Erandol Agricultural Produce Market Committee) सार्वत्रिक निवडणुकीची (Elections)  रणधुमाळी जोरात सुरु आहे. दि.२० माघारीची शेवटची मुदत असल्याने १८ जागांसाठी ३९ अर्ज  उरले आहेत.

यामुळे युतीच्या सहकार आणि आघाडीच्या शेतकरी विकास गटांमध्ये मोठी चुरस या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र माघार घेतल्याने,या निवडणुकीत पहिल्या फळीतील एक/दोन उमेदवार सोडून दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची जास्त संख्या आहे. एकूण २३४  अर्ज दाखल झाले होते.त्यातील काही बाद तर काही उमेदवारांनी माघार घेतली आहे.  

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com