धनगर समाज व मेंढपाळांच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार : खा. रक्षाताई खडसे

धनगर समाज व मेंढपाळांच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार : खा. रक्षाताई खडसे

मुक्ताईनगर Muktainagar

  शहरातील प्रवर्तन चौकात जय मल्हार मेंढपाळ सेना (Jai Malhar Shepherd Army) व समस्त धनगर समाज (Dhangar society) मुक्ताईनगर तालुका यांच्या वतीने “भव्य धनगर समाज निर्धार मेळावा” (Dhangar Samaj determination meeting) चे खा.श्रीमती रक्षाताई खडसे, आ.चंद्रकांत पाटील व जय मल्हार सेना सरसेनापती  लहूजी शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थित आयोजन (organized) करण्यात आले होते. देवी अहिल्याबाई होळकर (Devi Ahilyabai Holkar) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी ऊन, वारा व पाऊस अशा कठीण परिस्थितीत धनगर समाज मेंढी पालन केलेल्या मेंढ्या चारून आपला उदरनिर्वाह करत असुन, मेंढ्यांना वनक्षेत्रात चराई केल्यामुळे वन विभागामार्फत मेंढपाळांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दखल करण्यात येतात यासारख्या समस्या उपस्थित करण्यात आल्या असता, मेंढपाळांवरील गुन्हे रद्द करणे तसेच धनगर समाज व मेंढपाळांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार याबाबत लोकसभा व राज्य सरकार कडे पाठपुरावा असे खासदार रक्षाताई खडसे यांनी सर्व उपस्थित धनगर समाज बांधवांना आश्वासन दिले.

यावेळी खा. रक्षाताई खडसे यांच्यासह, आमदार चंद्रकांत पाटील, जय मल्हार सेना सरसेनापती  लहूजी शेवाळे, सौ.रंजना बोरसे, नगरसेवक  राजेंद्र हिवराळे, भाजपा तालुका सरचिटणीस  चंद्रकांत भोलाने, भाजपा शहराध्यक्ष  पंकज कोळी,  नामदेव बाजोड, सौ. मंगला हिवराळे, कारभारी दांडगे, मनोज मोरे, सुधाकर जुमळे, कैलास वाघ, रामभाऊ घुले, सूर्यभान कवळे, भावराव तांबे, साहेबराव करडे, .हिरामण येळे,.रविंद्र पाचपोळ,  बाळू शिंदे, पुंडलिक सरक, शंकर केसकर, संदिप जुमळे, सिताराम बिचकुले, भारत मदने ,सोना खताळ, तानु नानकर,मका कांदडे, देमा नानवर, भिका माने, भावडा कोळपे,दिगंबर कांदडे,तुळशिराम गोयकर, पंढरी पडळकर,.दादाराव बिचकुले यांच्यासह असंख्य धनगर समाज बांधव उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com