
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
आसोद्यात होणारे Poet Bahinabai Chaudhary यांचे स्मारक Monument हे प्रशासकीय व राजकीय दुर्लक्षतेमुळे अर्धावस्थेत पडून आहे. स्मारकाचे निर्माण हे केवळ स्वप्नच राहू नये, यासाठी स्मारकाच्या निधीसाठी Funding ग्रामस्थांतर्फे जनआंदोलन Mass movement छेडण्याचा निर्धार मंगळवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आला. आसोदा Asoda येथील त्यांच्या माहेरातील वाड्यात त्यांना अभिवादनही करण्यात आले.
बहिणाबाईच्या स्मारकाचे बांधकाम 50 टक्के पूर्ण झाले आहे. गेल्या चार वर्षापासून निधी अभावी बांधकाम बंद आहे. यामुळे स्मारकाला गवताने वेढले आहे. वारंवार निवेदने देवूनही राजकीय पदाधिकारी व प्रशासकीय अधिकार्यांनी याकडे दुर्लक्षच केले आहे. यामुळे स्मारकाला निधी उपलब्ध करून बांधकाम सुरु करण्यासाठी लोकवर्गणीतून निधी उभारण्याचाही ठराव यावेळी ग्रामस्थांनी केला.
स्मारक विकास समितीकडून अभिवादन
स्मारक विकास समितीकडून बहिणाबाईंच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केले. यावेळी समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी, सरपंच अनिता कोळी, युनियन बॅक व्यवस्थापक श्रीपाद ठाले, प. स. सदस्या ज्योती महाजन, उपसरपंच वर्षा भोळे, सदस्य सुनील पाटील रविकांत चौधरी, योगिता नारखेडे यांच्यासह स्मारक समितीचे उपाध्यक्ष प्रदीप भोळे, सदस्य महेश भोळे, संजय महाजन, नितीन चौधरी, तुषार महाजन, खेमचंद महाजन, अजय महाजन, संदीप नारखेडे, गिरीष भोळे, आदी उपस्थित होते.