रिक्षा लांबविणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात

जळगाव शहर पोलिसांची कारवाई
जेरबंद
जेरबंद

जळगाव -JALGAON

शहरातील दाणाबाजार (Grain Market) परिसरातून रिक्षा (rickshaw) लांबविल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात मंगळवारी सायंकाळी जळगाव शहर पोलिसांनी (City Police) तांबापुरा येथील अल्पवयीन मुलाला (minor boy) ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली रिक्षा हस्तगत (Acquired) करण्यात आली आहे.

दीपक भिमराव पवार (वय ३५,रा.सम्राट कॉलनी) यांच्या मालकीची रिक्षा (क्र.एम.एच.१९ व्ही ५३९९) ही दाणाबाजार परिसरात दुकानासमोर उभी असतांना चोरीस गेल्याची घटना शनिवार, २५ सप्टेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या.

त्यानुसार गणेश पाटील, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर व प्रणेश ठाकूर यांनी केलेल्या तपासणीत एका ठिकाणच्या फुटेजमध्ये रिक्षा व १६ वर्षीय मुलगा दिसून आला. तो तांबापुरातील असल्यावर निष्पन्न झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्याला रिक्षासह ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेला मुलगा हा कचोरी-समोसा विक्रीच्या हातगाडीवर कामाला आहे. मुलाला बालन्यायालयात हजर करण्यात येवून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com